Praful Patel: प्रफुल्ल पटेल करणार मोठे गौप्यस्फोट! लिहिणार पुस्तक; म्हणाले, माझ्याकडं...

दिलीप वळसे पाटलांच्या पोटातही खूप काही दडलंय असंही पटेल यावेळी म्हणाले.
Prafull Patel
Prafull Patel
Updated on

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसबाबत अनेक मोठे गौप्यस्फोट करण्यासाठी खासदार प्रफुल्ल पटेल तयार आहेत. खुद्द पटेल यांनी हे सांगितलं आहे. माझ्याकडं बोलण्यासाठी खूप काही असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. दिलीप वळसे पाटील यांच्याकडंही खूप काही सांगण्यासारखं असल्याचं पटेल यांनी म्हटलं आहे. (Praful Patel will open big secrets about NCP and Sharad Pawar make wish to wrote a book on it)

Prafull Patel
Chhattisgarh Exit Poll: छत्तीसगडमध्ये काँग्रेसचं उधळणार गुलाल?; स्पष्ट बहुमताचे संकेत

सभेला संबोधित करताना पटेल म्हणाले, 2 जुलैला आपण सत्तेवर आलो, आपण जे पाऊल टाकलं ते पक्षाचा हितासाठी टाकलं आहे. माझ्याकडं बोलण्यासाठी अनेक मुद्दे आहेत भविष्यात मी देखील पुस्तक लिहिणार आहे, त्यावेळी मी माझी बाजू मांडेल. इथं दिलीप वळसे पाटील देखील बसले आहेत, त्यांच्या देखील पोटात खूप काही दडलं आहे. अनेक गोष्टी त्यांनी पोटात साठवल्या आहेत.

Prafull Patel
Madhya Pradesh Exit Polls : मध्य प्रदेशात काँग्रेस-भाजपत 'काँटे की टक्कर'; एक्झिट पोल काय सांगतात?

आपल्या पक्षाचा प्रवास केवळ विधानसभा लोकसभेपर्यंत नाही पुढील 20 ते 25 वर्षे अजित पवार यांच्या नेतृत्वखाली आपल्याला काम करायचं आहे. मी शरद पवार यांच्यासोबत अनेक वर्ष काम केलं आहे. शरद पवार काँग्रेसमधून बाहेर पडले आणि 1986 मध्ये परत आले. शरद पवार हे कायम प्रवाहासोबत चाललेत आपण देखील प्रवाहासोबत चाललो आहोत, असंही पटेल यांनी म्हटलं. (Latest Marathi News)

Prafull Patel
Coca Cola: 'कोका कोला'ची महाराष्ट्रातील पहिली फॅक्टरी कोकणात उभी राहणार; मुख्यमंत्र्यांनी केली घोषणा

पटेल पुढे म्हणाले, अजित पवार यांच्यासोबत माझे चांगले आणि गोड संबंध होते. मात्र, मी त्यांच्या जवळ नव्हतो कारण मी शरद पवारांच्या जवळ होतो, त्यामुळं अजित पवार यांच्यासोबत मी गेलो त्यावेळी सर्वांना आश्चर्य वाटलं की अजित पवार यांच्यासोबत मी कसा काय? अनेकांना वाटलं यांचं आतून सख्य आहे. (Marathi Tajya Batmya)

आपण अजित पवार यांच्या सोबत जाताना राजकिय भूमिका घेतली होती. आता आपण भुमिका घेतली आहे दादा एके दादा. दादांसोबत जाण्याचा आता निर्णय घेतला आहे.

Prafull Patel
पन्नू हत्येचा कट रचल्याप्रकरणी अमेरिकेच्या कारवाईवर भारताचं मोठं वक्तव्य! म्हटलं, हे कृत्य म्हणजे...

सन 2004 साली राष्ट्रवादी नुकतीच जन्माला आली होती. त्यावेळी 16-16-16 करत लोकसभा लढण्याचा निर्णय घेतला आणि भाजप सोबत जाण्याचा निर्णय घेतला होता, माझ्या घरी मीटिंग झाली होती. स्वतः प्रमोद महाजन माझ्या घरी होते. (Latest Marathi News)

अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, जसवंत सिंग यांच्या सूचनेनुसार हे झालं होतं. त्यावेळी गोपीनाथ मुंढे यांना वाटलं की आपलं दिल्लीतल महत्त्व कमी होईल त्यामुळे त्यांनी बळासाहेब ठाकरेंना याची माहिती लीक केली आणि त्यामुळं बाळासाहेब ठाकरेंनी आडवी तिढवी टीका केली आणि होणारी युती होऊ शकली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.