Bacchu Kadu: 'अजून लग्न ठरायचं आहे, मंगलकार्यालयाचं नाव कसं सांगू'; बच्चू कडू असं का म्हणाले?

bacchu-kadu
bacchu-kadu
Updated on

Bacchu Kadu on Upcoming election

मुंबई- अजून लग्न ठरायचं आहे, तारिख ठरायची आहे. त्याआधीच मंगलकार्यालयाचं नाव कसं सांगू, अशी मिश्किल टिप्पणी प्रहार संघटनेचे प्रमुख आणि अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी केलं. महाविकास आघाडीसोबत का युतीसोबत निवडणूक लढवणार असा प्रश्न बच्चू कडू यांना विचारण्यात आला होता.यावेळी त्यांनी मिश्किल उत्तर दिलं.

अजून तारिख ठरायची आहे. त्यामुळे तारिख ठरल्यानंतर याबाबत निर्णय घेऊ. अजून वातावरण तयार झालेलं नाही. त्यामुळे आत्ताच निर्णय घेणार नाही. अजून लग्न जुळायचं आहे. तारिख ठरायची आहे. त्यामुळे आधीच मंगलकार्यालय कोणतं आहे ते कसं सांगू, असं कडू म्हणाले.

bacchu-kadu
3D-Printed Post Office: 3D प्रिंटिंग तंत्रज्ञानावर आधारित पहिल्या पोस्ट ऑफिसचे उद्घाटन; जाणून घ्या काय आहे तंत्रज्ञान

आरोप करताना पुरावे न घेता बोललं जातंय. त्यानंतर त्याची बातमी केली जाते. खोक्यांच्या बाबतीत आरोप करण्यात आले आहेत. आम्हा सर्वांना, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासकट तुरुंगात टाकावं. आम्ही समोर येतो. तुमच्याकडे पुरावे आहेत का? पुरावे नसताना खोके घेतले, खोके घेतले म्हणून आरोप कशाला करायचे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

bacchu-kadu
MVA Seats Formula: "जिंकेल त्याची जागा''; महाविकास आघाडीतील जागा वाटपाचे 'सूत्र' ठरले

सिनेटच्या निवडणुकीबाबत बच्चू कडू म्हणाले की, निवडणुका लागायला पाहिजे होत्या. सरकार निवडणूक घ्यायला घाबरायचं काही कारण नाही. नोव्हेंबर डिसेंबरपर्यंत महापालिकेच्या निवडणुका लागण्याची शक्यता आहे, असं ते म्हणाले.

प्रहारची १५ जागांवर लढण्याची तयारी आहे. पण, आमचा सगळ्या दृष्टीकोणातून विचार झाला तर भाजपचा आम्ही विचार करु. प्रत्येकाने आपापलं घरं जपायचं असते.घर न जपता काम सुरु केलं तर पक्ष सोडून नुसती समाजसेवाच सुरु करावी लागेल. आम्ही राजकीय पक्ष आहोत आणि राजकीय पद्धतीने आम्ही याला सामोरे जावू, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली. (Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()