Prakash Ambedkar : ‘वंचित’चे आता ‘आरक्षण बचाव’

‘‘कुणबी-मराठा आरक्षणात सगेसोयरे ही भेसळ ठरत आहे. कुणब्यांना पूर्वीपासूनच आरक्षण आहे. ते त्यांना मिळणार आहे. मात्र, ज्यांनी अर्ज केला नाही, त्यांनाही सरकार प्रमाणपत्र देत आहे.
Prakash Ambedkar
Prakash Ambedkarsakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर : ‘‘कुणबी-मराठा आरक्षणात सगेसोयरे ही भेसळ ठरत आहे. कुणब्यांना पूर्वीपासूनच आरक्षण आहे. ते त्यांना मिळणार आहे. मात्र, ज्यांनी अर्ज केला नाही, त्यांनाही सरकार प्रमाणपत्र देत आहे. कुणबी नोंदी शोधून दिलेले प्रमाणपत्र रद्द केले पाहिजे. आरक्षणाच्या जनजागृतीसाठी वंचित बहुजन आघाडी २५ जुलैपासून राज्यभरात आरक्षण बचाव यात्रा काढणार आहे,’’ अशी माहिती अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

ॲड. आंबेडकर म्हणाले, ‘‘२६ जुलै १९०२ ला कोल्हापूर येथे राजर्षी शाहू महाराजांनी आरक्षणाची घोषणा केली होती; तसेच ओबीसीचे काही नेते व पदाधिकाऱ्यांनी ओबीसींचा लढा तुम्ही हातात घ्यावा, अशी विनंती केली. त्यामुळेच ही आरक्षण बचाव यात्रा काढण्यात येत आहे. यात्रेची सुरवात चैत्यभूमीपासून होऊन समारोप छत्रपती संभाजीनगरात ७ किंवा ८ ऑगस्टला होणार आहे’’, अशी माहितीही त्यांनी दिली. ‘‘राज्यात श्रीमंत मराठ्यांनी वाद लावला आहे. त्यामुळे जी परिस्थिती निर्माण झाली, ती अत्यंत भयानक आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या अनुषंगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वपक्षीय बैठक बोलाविली होती. या बैठकीत राष्ट्रवादी कॉँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, कॉँग्रेस, शिवसेना (ठाकरे गट) यांच्यापैकी कुणीच उपस्थित नव्हते. हे तीनही श्रीमंत पक्ष आपली भूमिका मांडत नाहीत, तोपर्यंत यावर तोडगा निघणार नाही. त्यामुळे या पक्षांनी दंगल होण्याची वाट पाहू नये,’’ अशी टीकाही आंबेडकर यांनी केली.

शिष्यवृत्ती दुप्पट करा

ओबीसींचे आरक्षण वाचायला हवे, एससी-एसटी विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती दुप्पट करावी, सध्या जी शिष्यवृत्ती मिळते ती केवळ केंद्राची आहे. इतर राज्यांप्रमाणे त्यात राज्याचा हिस्सा मिळाला पाहिजे. ओबीसींच्या विद्यार्थ्यांनाही एससी, एसटीला जी शिष्यवृत्ती मिळते, ती जशीच्या तशी लागू करावी; तसेच आरक्षणातही एससी, एसटीबरोबरच ओबीसींनाही बढतीत पदोन्नती मिळायला हवी, असेही आंबेडकर म्हणाले.

अजित पवारांना दिली ऑफर

‘‘वंचितमध्ये जातो असे सांगत अजित पवार वंचितला वापरत आहेत. त्यांनी अगोदर महायुतीतून बाहेर पडावे, त्यानंतर आम्ही त्यांना परत उभे करू’’, असा सल्ला देत आंबेडकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनाच ऑफर दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.