Prakash Ambedkar: वंचितसोबत जागा वाटपाबाबत पटोलेंच्या दाव्यावर आंबेडकरांचा खरमरित टोला; म्हणाले, लबाडांचा...

प्रकाश आंबेडकरांनी ट्विवट करुन याची माहिती दिली आहे.
Nana Patole Prakash Ambedkar
Nana Patole Prakash Ambedkaresakal
Updated on

मुंबई : वंचित बहुजन आघाडीसोबत जागा वाटपाबाबत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलेला दावा वंचितचे संयोजक प्रकाश आंबेडकर यांनी खोडून काढला आहे. तसेच त्यांच्या विधानावरुन त्यांनी खरमरित टोलाही लगावला आहे. हा लबाडांचा पराक्रम असल्याची टिप्पणी त्यांनी केली आहे. (Prakash Ambedkar denial on Nana Patole claim that sharing seats)

Nana Patole Prakash Ambedkar
Murder: बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याची हत्या, तिघांना अटक; विदर्भात घडला थरार

प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट करुन यासंदर्भातील बातम्या खोडून काढल्या आहेत. आंबेडकरांनी ट्विटमध्ये म्हटलं की, सफेद झूठ! कदाचित नाना पटोले बातम्यांमध्ये चर्चेत राहण्यासाठी हे सर्व खोटे बोलत असावेत. बरं, हे पहिल्यांदाच घडलं नाहीये तर तो लबाडांचा पराक्रम आहे.

Nana Patole Prakash Ambedkar
टेस्लानं गमावला अव्वल क्रमांक, 'ही' कंपनी ठरली वरचढ

आंबेडकर म्हणतात, जागा वाटपाबाबत पूर्णपणे काहीही सुरू केले गेलेलं नाही. INDIA Alliance किंवा MVAमध्ये वंचितला आमंत्रित करण्याबाबत काँग्रेस हायकमांडशी आमचा कोणताही संवाद झालेला नाही. तसेच, युतीचं निमंत्रण न देता जागावाटपाची कोणतीही चर्चा कशी होऊ शकते? असंही त्यांनी स्पष्टीकरण देताना म्हटलं आहे.

Nana Patole Prakash Ambedkar
Adani-Hindenberg: अदानी-हिंडेनबर्ग प्रकरणाची स्वतंत्र चौकशी होणार का? सुप्रीम कोर्ट उद्या सुनावणार फैसला

प्रकाश आंबेडकरांशी चर्चा सुरु झाली असून जागा वाटप अद्याप ठरलेलं नाही. मविआतील जागा वाटपाचा निर्णय दिल्लीत ठरणार आहे, अशी माहिती नाना पटोले यांनी दिली होती. त्यामुळं वंचित बहुजन आघाडीसोबतचा मविआ आणि इंडिया आघाडीचा प्रश्न सुटल्याचं बोललं जात होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.