Loksabha Election : प्रकाश आंबेडकरांचा 'मविआ'तील प्रवेश अद्याप नाही; काँग्रेस प्रभारींचा महत्त्वाचा दावा

लोकसभेच्या (Loksabha Election) जागा वाटपाची महाविकास आघाडीमध्ये चर्चा सुरू आहे.
Loksabha Election Prakash Ambedkar Ramesh Chennithala
Loksabha Election Prakash Ambedkar Ramesh Chennithalaesakal
Updated on
Summary

'भाजपला देशात फक्त धार्मिक ध्रुवीकरण करण्यातच रस आहे. स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी श्रीरामांचा वापर सुरू केला, याचे आम्हाला दुःख आहे.'

पुणे : ‘‘लोकसभेच्या (Loksabha Election) जागा वाटपाची महाविकास आघाडीमध्ये चर्चा सुरू आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्याबरोबर शरद पवार आणि उद्धव ठाकरे चर्चा करत आहेत. आंबेडकरांच्या (Prakash Ambedkar) प्रवेशासाठी आमची काहीही हरकत नाही; पण अद्याप निवडणूक जाहीर झाली नसल्याने महाविकास आघाडीत त्यांच्या प्रवेशाचा निर्णय जाहीर झालेला नाही,’’ असे महाराष्ट्राचे काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला (Ramesh Chennithala) यांनी सांगितले.

Loksabha Election Prakash Ambedkar Ramesh Chennithala
Shambhuraj Desai : 'आयोगानं धनुष्यबाण चिन्ह आम्हाला दिलंय, त्यामुळं शिवसेना फुटली असं कोणीच म्हणू शकत नाही'

पश्‍चिम महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांची मंगळवारी (ता. २३) पुण्यातील काँग्रेस भवनात बैठक होती. त्यापूर्वी चेन्निथला यांनी पत्रकार परिषद घेऊन संवाद साधला. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, शहराध्यक्ष अरविंद शिंदे आदी उपस्थित होते.

Loksabha Election Prakash Ambedkar Ramesh Chennithala
कोल्हापुरातून 'या' हुकुमी एक्क्याला लोकसभेच्या रिंगणात उतरवण्याची तयारी; पटोलेंच्या वक्तव्याने चर्चांना उधाण

चेन्निथला म्हणाले, ‘‘देशात महागाई, बेकारीसारख्या अनेक समस्या आहेत. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) चर्चा करत नाहीत. भाजपला देशात फक्त धार्मिक ध्रुवीकरण करण्यातच रस आहे. स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी श्रीरामांचा वापर सुरू केला, याचे आम्हाला दुःख आहे. काँग्रेसने नेहमीच सर्व जाती-धर्मांना बरोबर घेतले. सध्याची स्थिती पाहता धर्माच्या नावावर विभागणी सुरू करून देशातील महान परंपरा तोडली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनाही मंदिरात प्रवेश करण्यापासून रोखले. देव हा एका व्यक्तीचा नाही. ’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.