मुंबई : महाविकास आघाडीत अद्याप वंचित बहुजन आघाडीत समावेश झालेला असला तरी अद्याप जागा वाटपावरुन त्यांच्यात अंतिम निर्णय होत नाहीए. पण या चर्चेत नेमकी अडचण काय आहे? याबाबत वंचितचे समन्वयक प्रकाश आंबेडकर यांनी सूचकपणे सांगितलं आहे. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी लिहिलेल्या पत्राला उत्तर देताना आंबेडकरांनी त्यांना पत्राद्वारेच प्रत्युत्तर दिलं आहे. (prakash ambedkar may have doubts about the stand of sharad pawar and sanjay raut would go with bjp)
आंबेडकरांनी काय मांडली भूमिका?
आव्हाडांच्या पत्राला उत्तर देताना आंबेडकर म्हणतात, "आपण लिहिलेले पत्र व्यक्तीगत आहे, राष्ट्रवादीचे नेते म्हणून लिहीलेले नाही असे आम्ही समजतो. आम्ही नेहमी मानत आलो आहोत की पक्षाची असो की व्यक्तीगत, राजकारणाची भूमिका एकच असली पाहिजे. तुम्ही भाजपबरोबर समझोता करणार नाही याबद्दल व्यक्तीगतरित्या खात्री आहे. (Latest Maharashtra News)
परंतु, आपल्या पक्षाबद्दल ती खात्री देता येत नाही. कारण या अगोदर आपल्या पक्षाने बीजेपी बरोबर समझोता केलेला होता. त्यामुळे संविधान वाचविणे ही जी आपण व्यक्तीगत जबाबदारी घेतलेली आहे, त्याच्याशी आम्ही सहमत आहोत. पण आपला पक्ष संविधान वाचविण्यासाठी पुढे येईल का? याबद्दल आमच्या मनात शंका आहे"
शरद पवार आणि संजय राऊतांवर शंका?
आपल्या परीने आम्हाला संविधान वाचविण्यासाठी जे आणि जेवढे करणे शक्य आहे, तेवढे आम्ही संविधान वाचविण्यासाठी करत राहणार आहोत. त्यामुळे पत्राद्वारे आपण व्यक्तीगत संदेश पाठवला असला तरी त्यातून एक सूर दिसत आहे की, आम्ही संविधान वाचवायला निघालेलो नाही. या पत्राच्या माध्यमातून आम्ही आपल्याला हे सांगतो आहोत की, आपल्या पक्षाचे जे प्रतिनिधी त्या बैठकीमध्ये उपस्थित होते. त्यावेळी आमच्यातर्फे जेव्हा सांगण्यात आलं की, आपल्याला मतदारांना हे आश्वासित करावे लागेल की निवडणुकीनंतर आम्ही बीजेपी किंवा आरएसएसबरोबर समझोता करणार नाही. (Marathi Tajya Batmya)
तेव्हा आपल्या पक्षाचे जे प्रतिनिधी तिथे उपस्थित होते, ते त्यावर काहीच बोलले नाहीत, ते शांत बसले आणि एका अर्थाने मौनातून त्यांनी विरोध दर्शविला. आपणच फक्त म्हणालात की "लेखी लिहून द्यायला काय हरकत आहे?" ज्या शिवसेनेला आपण सोबत घेतले आहे. त्या शिवसेनेचे प्रतिनिधी संजय राऊत यांनी उघडउघड असे लिहून देण्यास नकार दिलेला आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर बघितले तर आम्हाला जर आपल्याबरोबर यायचे असेल, तर आम्हाला खात्री करुन घ्यावी लागेल की तुम्ही निवडणूक झाल्यानंतर बीजेपीबरोबर जाणार नाहीत, याची खात्री तुम्हाला द्यावी लागेल आणि ती व्यक्तीगत नाही तर तुमच्या पक्षाला द्यावी लागेल. आपण लिहिलेले हे पत्र सोशल मीडियावर टाकले आहे का? हे आम्हाला माहीत नाही. (Latest Marathi News)
तुम्ही जर हे सोशल मीडियावर दिले नसेल तर आम्ही ही आपल्याला आश्वासित करतो की, आमचे हे पत्र सोशल मीडियावर जाणार नाही. परंतु, आपले पत्र जर सोशल मीडियावर गेले तर आमचे पत्रही सोशल मीडियावर जाईल, असं स्पष्टपणे प्रकाश आंबेडकर यांनी आपली भूमिका मांडताना म्हटलं आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.