एकनाथ शिंदेंसमोर भाजपची मोठी अट? प्रकाश आंबेडकरांच्या दाव्याने खळबळ

प्रकाश आंबेडकर यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर प्रश्न उपस्थित केला आहे.
prakash ambedkar on eknath shinde
prakash ambedkar on eknath shindeesakal
Updated on
Summary

प्रकाश आंबेडकर यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर प्रश्न उपस्थित केला आहे.

राज्यात सध्या विधान परिषदेच्या निकालानंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे हे आमदारांना घेऊन गुवाहटी येथे आहेत. काल रात्री उशिरा मुख्यमंत्री ठाकरे हे वर्षा निवासस्थान सोडून मातोश्रीकडे रवाना झाले आहेत. या पार्श्वभूमीवर आता राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान, वंचितचे प्रकाश आंबेडकर यांनी एक वेगळं ट्विट केलं आहे. (Maharashtra Politics)

prakash ambedkar on eknath shinde
वेळीच शहाणे व्हा!, सामनातून बंडखोर आमदारांना इशारा

एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंविरोधात बंड पुकारलं असून भाजपसोबत जाण्यासाठी एकनाथ शिंदे आग्रही आहेत. उद्धव ठाकरेंनी तर थेट एकनाथ शिंदेंनी सांगावं मी योग्य राज्य कारभार करत नाही मी आता राजीनामा देतो, असं म्हटलं आहे. या वादात उडी घेत प्रकाश आंबेडकरांनी ट्वीट करत चर्चांना उधाण आणणार सवाल उपस्थित केला आहे. एकनाथ शिंदेंसमोर भाजपची मोठी अट घातली असल्याचा दावा प्रकाश आंबेडकरांनी केला आहे.(Prakash Ambedkar on Eknath Shinde)

प्रकाश आंबेडकर यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर प्रश्न उपस्थित केला आहे. एकनाथ शिंदे यांना भाजपमध्या येण्याची अट घातली आहे का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत असणाऱ्या गटाने भाजपमध्ये विलीन व्हावे आणि मगच सरकार स्थापन होईल अशी अट भाजपने एकनाथ शिंदेंना घातली आहे?, असं ते म्हणाले आहेत.

prakash ambedkar on eknath shinde
'जे स्वत:चं सरकार वाचवू शकले नाहीत, ते उद्धव ठाकरेंचं सरकार वाचवायला निघालेत'

दरम्यान, आणखी चार आमदारांसोबत आशिष जैस्वाल गुवाहाटी पोहोचत असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे शिंदे यांनी सांगितलेला ४० आमदारांचा आकडा आता पूर्ण होणार असल्याचं दिसतं आहे. एकनाथ शिंदे यांनी सर्व सूत्र हातात घेतल्याचं स्पष्ट झालं असून त्यांनी कायदेशीरपणे जाण्याचा प्रयत्न केला आहे. ईडीच्या कचाट्यात सापडलेले प्रताप सरनाईक सध्या शिंदेंसोबत आहेत. सूनील प्रभूला बघू, असंही ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.