Prakash Ambedkar : "गुजरात नरसंहार मॉडेल मणिपूरमध्ये आयात केलंय"; प्रकाश आंबेडकरांची मोदींवर टीका

अच्छे दिनच्या नावाखाली मोदी सरकारचं धार्मिक ध्रुविकरण सुरु असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
Prakash Ambedkar
Prakash Ambedkar esakal
Updated on

नवी दिल्ली : मणिपूरमधील हिंसाचारावरुन वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. गुजरात नरसंहार मॉडेलनुसार मणिपूरमध्ये हिंसाचार सुरु झाला, अशा शब्दांत आंबेडकर यांनी बोचरी टीका केली. पत्रकार परिषदेत ते बोलत होते. (Prakash Ambedkar on Manipur Violence Gujarat genocide model imported to Manipur)

Prakash Ambedkar
Shirsat Vs Chaturvedi: "...जर आम्ही चारित्र्य काढलं तर बात लंबी चलेगी"; शिरसाटांचं चतुर्वेदींना प्रत्युत्तर

आंबेडकर म्हणाले, "अच्छे दिनच्या नावाखाली भाजपनं कायम धार्मिक ध्रुविकरण आणि ब्राह्मणवादाला खतपाणी घालण्याचं काम केलं आहे. ज्यामुळं अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि अल्पसंख्यांक समूहाच्या विरोधात द्वेषातून केले जाणारे गुन्हे (hate-crimes) वाढले आहेत. (Marathi Tajya Batmya)

Prakash Ambedkar
Jaipur-Mumbai Exp Firing: प्रवाशांसोबत वाद नव्हता, 'या' कारणामुळं कॉन्स्टेबलनं झाडल्या गोळ्या; रेल्वे पोलीस आयुक्तांची माहिती

अशा प्रकारे मृत्यू आणि द्वेषाच्या व्यापारानं जातीय संहाराचं 2002चं गुजरात नरसंहार मॉडेलनं भाजपा-आरएसएसला केंद्रात सत्तेत बसवलं, तेच मॉडेल ईशान्य भारतात आयात केलं आहे. मणिपूरमध्ये सुरू असलेला हिंसाचार बघितला तर लक्षात येते की, गुजरातमधील २००२ हिंसाचाराशी बरंच साधर्म्य आहे. यामध्ये राज्य प्रायोजित हिंसाचार, संघर्ष जास्त काळ सुरू ठेवणे, नरसंहार, महिलांवर बीभत्स अत्याचार करणे, विटंबना करणे इत्यादी घटनांचा समावेश आहे. (Latest Marathi News)

Prakash Ambedkar
Jaipur-Mumbai Exp Firing: रेल्वेतील गोळीबारात मृत्यू; पोलीस अधिकाऱ्याच्या कुटुंबियांना २५ लाखांची नुकसान भरपाई

द्वेष आणि जातीवादाचं दुकान आणि त्या व्यापाराचा सर्वात मोठा ठेकेदार दिल्लीत बसून आहे. ही व्यक्ती स्वत:ला प्रधानसेवक म्हणवते. त्यांना मी सांगू इच्छितो की, 2002मध्ये गुजरात हिंसाचार घडल्यावर सोनिया गांधी यांनी तुम्हाला जे नाव दिलं होतं ते जाता जाता खरं करू नका. यामुळं एक धर्मनिरपेक्ष संघराज्य म्हणून भारताच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह लागलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.