Ashok Chavan: प्रकाश आंबेडकरांनी 'इंडिया' आघाडीत यावे ही माझी भूमिका, पण...; अशोक चव्हाणांचं विधान

Ashok Chavan and Prakash Ambedkar
Ashok Chavan and Prakash Ambedkar
Updated on

नवी दिल्ली - मुंबईत याच महिन्याच्या अखेरीस विरोधकांच्या इंडिया आघाडीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा शरद पवार गट, शिवसेना आणि महाराष्ट्र काँग्रेसने तयारी केली आहे. त्यातच आज काँग्रेसनेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी प्रकाश आंबेडकर यांच्या आघाडीत सामील होण्याबाबत विधान केलं आहे.

Ashok Chavan and Prakash Ambedkar
Share Market Closing: शेअर बाजारातील 2 दिवसांच्या तेजीला ब्रेक; गुंतवणूकदारांचे 46,000 कोटी रुपयांचे नुकसान

अशोक चव्हाण म्हणाले की, माझं प्रकाश आंबेडकर यांच्याशी संभाषण होतं. त्यामुळे प्रकाश आंबेडकर इंडियामध्ये आले तर चांगलच आहे. हा विषय राष्ट्रीय पातळीवरील आहे.

त्यावर मी बोलू शकत नाही. मात्र त्यांनी जर अनुमची दर्शवली तर पुढे निर्णय होऊ शकतो. प्रकाश आंबेडकर इंडिया आघाडीत सामील झाले तर आनंदच आहे, असंही चव्हाण यांनी म्हटलं.

Ashok Chavan and Prakash Ambedkar
Ramdas Kadam : उद्धव ठाकरे या जगातला सर्वात खोटारडा माणूस ; रामदास कदम यांची बोचरी टीका !

मराठा आरक्षणावर चव्हाण म्हणाले की, मागच्या मंत्रिमंडळात अजित पवार उपमुख्यमंत्री होते, मी देखील मंत्रिमंडळात होतो. मराठा आरक्षणाबाबत आता मुंबईत बैठक घेऊन उपयोग नाही. अजित पवारांना देखील कायदा कळतो, आता केंद्राने निर्णय घ्यायला पाहिजे. केंद्र सरकारने त्यावेळी राज्याचे हातपाय बांधून टाकले होते.

एकनाथ शिंदे आणि आमची भूमिका होती, ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे, असं सांगतानाच फडणवीस सरकारच्या काळात आरक्षणाचा जो निर्णय झाला तो केवळ नागरिकांची दिशाभूल करणारा होता, असंही चव्हाण यांनी नमूद केलं.

1 तारखेला इंडियाची बैठक मुंबईत आहे. देशाला दिशा देण्यासाठी इंडिया आघाडी तयार आहे. प्रत्येक राज्यात वेगवेगळी परिस्थिती आहे. मात्र आम्ही सगळे एकत्र येऊन नवा पर्याय देऊ. नागरिकांना देखील ही आघाडी आवडत असल्याचा दावा चव्हाण यांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.