Prakash Ambedkar: काँग्रेसमधील सुपारीबाजांची नावं तीन-चार दिवसांत जाहीर करणार; प्रकाश आंबेडकरांचा घणाघात

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी या सुपारीबाजांची पक्षातून हाकालपट्टी करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे.
Prakash Ambedkar
Prakash Ambedkaresakal
Updated on

मुंबई : महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यात जागा वाटपावरुन सध्या बरीच धुसफूस सुरु आहे. काँग्रेसमधील काही लोक हे सुपारीबाज म्हणून काम करत असल्याचा आरोप वंचितचे समन्वयक प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. या सुपारीबाजांची नावही येत्या तीन-चार दिवसांत आपण जाहीर करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. (prakash ambedkar will announce names of congress conspirator in three four days)

Prakash Ambedkar
Raj Thackeray on NCP: "राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निवडून येणाऱ्यांची मोळी"; राज ठाकरेंचा शरद पवारांवर घणाघात

आंबेडकर म्हणाले, "काँग्रेसमध्ये कोण कोण सुपारीबाज आहेत हे मी तीन-चार दिवसांत सांगेन. त्यांची नावंही घ्यायला आम्ही घाबरत नाही. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी या सुपारीबाजांची पक्षातून हाकालपट्टी करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे. (Latest Marathi News)

Prakash Ambedkar
Delhi Crime: बायकोला धडा शिकवण्यासाठी बापानं घेतला २९ वर्षीय मुलाचा जीव! जिम ट्रेनर हत्येप्रकरणी मोठा खुलासा

मविआची आजची बैठक रद्द झालेली आहे पण ते आम्हाला कळवण्याची तसदीही कोणीही घेतलेली नाही. तुम्ही बैठक घेता रद्द करता ते सांगत नाहीत. त्यामुळं मविआत आमची जागा काय आहे हे आम्हाला कळलेलं आहे. (Marathi Tajya Batmya)

Prakash Ambedkar
Mayavati: युपीमध्ये निवडणुकीची गणितं बदलणार! इंडिया आघाडीसोबत जाण्याबाबाबत मायावतींनी स्पष्टच सांगितलं

अद्याप १५ जागांवरील वादातील तिढा सुटलेला नाही. मतांचं ध्रुवीकरण आधीच झालेलं आहे. जरांगे पाटील यांनी आधीच या जागांचं ध्रुवीकरण करुन ठेवलेलं आहे. त्यामुळं यांच्याकडून काही वेगळं ध्रुवीकरण होणार नाही, असंही आंबेडकर यांनी म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.