लाचारी...चळवळीला संपवण्याचा प्रयत्न; प्रकाश आंबेडकर मोठा निर्णय घेणार? व्हिडिओतून कार्यकर्त्यांना केलं आवाहन

loksabha election 2024: वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी एक व्हिडिओ प्रसिद्ध केला असून कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे.
Prakash Ambedkar
Prakash Ambedkar Esakal
Updated on

मुंबई- वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी एक व्हिडिओ प्रसिद्ध केला असून कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून आंबेडकर यांनी मोठा निर्णय घेणार असल्याचे संकेत दिले आहेत. महाविकास आघाडीत सहभागी होण्याच्या संदर्भात आंबेडकर मोठा निर्णय घेऊ शकतात. ( Prakash Ambedkar will take a big decision loksabha elction 2024)

प्रकाश आंबेडकर म्हणालेत की, वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आणि हितचिंतक यांनी युतीच्या संदर्भात सल्ला दिला. त्यांचा मी आभारी आहे. माझ्या आजोबांनी चालवलेली चळवळ लाचारीच्या विरोधातील होती, मीही लाचारी मान्य करणार नाही. युतीमध्ये अडचण येऊ नये म्हणून व्यक्तिगत हेवेदावे येऊ दिले नाहीत. पण, जेथे चळवळीलाच लाचार केले जात आहे, लाचार करुन संपवलं जात आहे हे कधीही सहन करणार नाही. ( An appeal was made to workers through video)

Prakash Ambedkar
Akola News : वंचितची महाविकास सोबत आघाडी होण्याची शक्यता धुसरच; प्रकाश आंबेडकर अकोल्यातून निवडणूक लढवणार

शाहु-फुले-आंबेडकरी मतदारांना माझे आवाहन आहे. आपल्यामध्ये जिंकलो पाहिजे ही भावना आहे. पण, काही गोष्टी बोलू शकत नाही. पण अनेक ठिकाणी आपण जिंकू अशी परिस्थिती आहे. चळवळीचा विचार जास्त महत्त्वाचा आहे.व्यक्तिगत विचार हा व्यक्तीपर्यंत मर्यादीत राहतो. आपण सार्वजनिक जिवनात राहतो. त्यामुळे सार्वजनिक आणि सार्वत्रिक जो निर्णय घेतला जातो त्याप्रमाणे आपण वागलं पाहिजे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडी जो निर्णय घेईल त्याला शाहू-फुले-आंबेडकरी जनतेचा पूर्ण पाठिंबा आहे असं मी गृहित धरतो, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

Prakash Ambedkar
Akola Lok Sabha 2024: अनुप धोत्रेंना मिळणार तगडी फाईट! प्रकाश आंबेडकरांची निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची घोषणा

मविआकडून चार जागांचा प्रस्ताव

महाविकास आघाडीकडून वंचित बहुजन आघाडीला चार जागांचा प्रस्ताव देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र, हा प्रस्ताव आंबेडकरांना अमान्य आहे. त्यामुळे आंबेडकर वेगळा विचार करत आहेत. महाविकास आघाडीचे नेते संजय राऊत यांच्या म्हणण्यानुसार, अद्याप प्रकाश आंबेडकरांसोबत चर्चा सुरु आहे. त्यांचे मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. वंचितकडून उद्या पत्रकार परिषद घेतली जाणार आहे. यामध्ये आंबेडकरांकडून मोठा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.