नागपूर : जेष्ठ समाजसेवक प्रकाश आमटे हे तब्बल अडीच महिन्यांच्या उपचारानंतर बरे होऊन घरी पोहोचले आहेत. त्यांच्यावर पुण्यातील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. त्यांच्यावर या काळात पाच शस्त्रक्रिया करण्यात आल्या होत्या. काही दिवसांपूर्वी त्यांची स्थिती चिंताजनक होती. त्यानंतर आता ते बरे झाले होऊन त्यांना घरी आणण्यात आले आहे.
(Prakash Amte Discharge After Two and Half Month)
दरम्यान, पुण्यात त्यांच्यावर उपचार चालू असताना ते खोलीत कोसळल्याने त्यांचे मनगट फ्रॅक्चर झाले होते. त्यानंतर त्यांच्या मनगटावर प्लास्टर लावण्यात आलं होतं. दीड महिन्याच्या कालावधीत जखम भरून आल्याने प्लास्टर काढण्यात आले असल्याची माहिती अनिकेत आमटे यांनी दिली. अनिकेत यांनी सांगितलं की, "काल डॉक्टरांनी हॉस्पिटलमध्ये बोलावले. त्यात समाधानकारक सुधारणा होत असल्याने डॉक्टरांनी आज बाबांना नागपूरला हलवण्याची परवानगी दिली आहे.
मधले काही दिवस त्याच्यासाठी आणि आमच्यासाठीही खूप वेदनादायी होते. 2 महिने सतत ताप आणि न्यूमोनियामुळे त्याचे वजन 9 किलो कमी झाले. कॅन्सरसारखा भयंकर आजार कुणालाही होऊ नये, अशी मी निसर्गाकडे प्रार्थना करतो." असं अनिकेत आमटे यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे.
यावेळी अनिकेत आमटे यांनी मंगेशकर हॉस्पिटलमधील डॉक्टरांचे आभार मानले आहेत. "DMH मधील डॉक्टरांच्या अथक परिश्रमाने, परिचारिका आणि कर्मचार्यांची काळजी आणि तुम्हा सर्वांच्या शुभेच्छांमुळे बाबांना बरे होण्यास मदत झाली. संसर्गाचा धोका टाळण्यासाठी सध्या गर्दी टाळावी, असा सल्ला डॉक्टरांनी दिला. येत्या काही दिवसांत डॉक्टरांच्या परवानगीने बाबांना सर्वांना भेटता येणार आहे.आम्ही सर्व आमटे कुटुंबीय तुमचे खूप खूप आभारी आहोत.
पुण्यातील ७५ दिवसांच्या मुक्कामात अनेकांनी आम्हाला विविध प्रकारे साथ दिली. आम्हाला आशा आहे की तुमचे दयाळू आणि विनम्र प्रेम नेहमीच आमच्यासोबत असेल." अशा शब्दांत अनिकेत आमटे यांनी सर्वांचे आभार मानले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.