राणे साहेब जे काय बोलले ते ठाकरी भाषेमध्ये बोलले आहेत. बाळासाहेबांप्रमाणे रोखठोख बोलले आहेत.
चिपळूण - भाजपचे केंद्रीय मंत्री नेते नारायण राणे (narayan rane) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. यामुळे राजकीय वर्तुळातून वेगवेगळ्या प्रतिक्रीया उमटत आहेत. भाजपाचे नेते प्रमोद जठार (pramod jathar) यांनी गुन्हा दाखल झाला म्हणून काय भूमिका ठरत नाही, आमचे वकील माहिती घेत आहेत. आम्ही तपासून पाहू, परंतु कोणत्याही स्थितीत यात्रा याठिकाणी सुरू होईल असा इशारा त्यांनी दिला आहे.
ते म्हणाले, राणे साहेब जे काय बोलले ते ठाकरी भाषेमध्ये बोलले आहेत. बाळासाहेबांप्रमाणे (balasaheb thackeray) रोखठोख बोलले आहेत. राज्याच्या मुख्यमंत्री यांच्याकडून देशाचा स्वातंत्र्य दिनाचा अपमान झाला आहे. त्यांना ७५ वा देशाचा स्वातंत्र्य देशाचा वाढदिवस लक्षात नसावा का? हे एक जबाबदार व्यक्तीमत्वाला शोभत का? या गोष्टीचा राणे यांना राग आला आणि या मुद्द्याला धरुन त्यांनी मुख्यमंत्र्यावर (uddhav thackeray) ठाकरी भाषेत खोचक टीका केली आहे.
मुख्यमंत्री हे घटनात्मक पद आहे. या पदाबद्दल अशा पद्धतीचे वक्तव्य करू नये, असे त्यांना सांगितले होते, मात्र ते ठाकरी भाषेत सांगितले आहे. अशा गोष्टींविषयी राणेसाहेब बोलणारच. भारतीय जनता पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता राणेंसोबत आहे. पक्षाचा (bjp) तळागाळातला कार्यकर्ता खडबडून जागा होणार आहे. कोणत्याही परिस्थितीत आज कोकणातील यात्रा सुरू होणारच अशी प्रतिक्रीया त्यांनी दिली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.