काँग्रेसचा बालेकिल्ला राखण्याचे प्रणिती शिंदेंसमोर आव्हान! सोलापूर ‘शहर मध्य’मध्ये चौरंगी लढत; ६० हजारांहून अधिक मते घेणाराच होईल आमदार, जाणून घ्या समिकरणे...

स्वत: उमेदवार असणे व दुसऱ्याला उमेदवारी देऊन प्रचार करणे यात खूप फरक असतो, हे राजकारणात अनेकदा सिद्ध झाले आहे. हे समीकरण ओळखून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बार्शीऐवजी शहर मध्य मतदारसंघ घेतला. खासदारकीला शहर मध्यच्या आमदाराने आपला उमेदवार पराभूत केल्याचे शल्य देखील त्यामागे असल्याची चर्चा आहे.
solapur
praniti shindesakal
Updated on

सोलापूर : राज्यात सत्तांतर झाल्यावर प्रणिती शिंदे या सोलापूर जिल्ह्यात एकमेव विरोधी पक्षातील आमदार होत्या. लोकसभा निवडणुकीतून त्या खासदार होऊन दिल्लीत गेल्या. पण, तीन टर्म आमदारकीची हॅट्‌ट्रिक करत त्यांनी शहर मध्य हा काँग्रेसचा बालेकिल्ला बनविला. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील भलेभले उमेदवार विधानसभेला पराभूत होत असताना प्रणिती शिंदेंसमोर मोदी लाटही चालली नाही. मात्र, २०२४च्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रणनीतीने काँग्रेससमोर सध्या विजयाचे कडवे आव्हान उभे राहिले आहे. या मतदारसंघात भाजप महायुतीकडून देवेंद्र कोठे, काँग्रेस महाविकास आघाडीकडून चेतन नरोटे, एमआयएमकडून फारुक शाब्दी व माकपतर्फे माजी आमदार नरसय्या आडम अशी चौरंगी लढत आहे.

२०२४च्या लोकसभा निवडणुकीत सलग तीनवेळा आमदार राहिलेल्या प्रणिती शिंदेंना शहर मध्य मतदारसंघातून ९० हजार ४६८ तर भाजपचे उमेदवार राम सातपुते यांना ८९ हजार ६७२ मते मिळाली. या आव्हानात्मक निवडणुकीत शहर मध्य या प्रणिती शिंदेंच्या बालेकिल्ल्यात भाजपला तेवढी मते मिळाली, हे विशेष. दरम्यान, स्वत: उमेदवार असणे व दुसऱ्याला उमेदवारी देऊन प्रचार करणे यात खूप फरक असतो, हे राजकारणात अनेकदा सिद्ध झाले आहे. हे समीकरण ओळखून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बार्शीऐवजी शहर मध्य मतदारसंघ घेतला. खासदारकीला शहर मध्यच्या आमदाराने आपला उमेदवार पराभूत केल्याचे शल्य देखील त्यामागे असल्याची चर्चा आहे.

हा मतदारसंघ बहुभाषिक असून मुस्लिम समाज निर्णायक आहे. याशिवाय मोची, साळी (पद्मशाली), लोधी व बौद्ध समाजाचीही भूमिका महत्त्वाची आहे. पण, काँग्रेसकडून उमेदवारी न मिळाल्याने मोची, मुस्लिम समाज तसेच महाविकास आघाडीकडून जागा न सोडल्याने माकप कार्यकर्त्यांची नाराजी असून, मोची समाजातील पाच माजी नगरसेवकांनी काँग्रेसला हात दाखवून त्याच हातात भाजपचे कमळ घेतले. या मतदारसंघात महेश कोठेंना मानणारा वर्ग देखील मोठा आहे. दरम्यान, विधानसभेच्या मागील दोन्ही निवडणुकांत एमआयएमला ३७ ते ३९ हजारांपर्यंत मते मिळाली. माकपला १० ते १४ हजारांपर्यंत मते आहेत. यंदा भाजपसमोर तगड्या अपक्षाचे कोणतेही आव्हान नाही.

फारुक शाब्दी, चेतन नरोटे, तौफिक शेख, आडम मास्तर यांच्यात मुस्लिम मतांचे विभाजन होईल, अशी चर्चा आहे. या मतदारसंघात एक लाख ७६ हजार ११५ महिला तर एक लाख ७० हजार ५०९ पुरुष मतदार आहेत. पुरुषांच्या तुलनेत महिला मतदारांची संख्या अधिक असल्याने महिलांचा कौल महत्त्वपूर्ण ठरणार आहे. चौरंगी लढतीत कोण बाजी मारणार, याची सर्वांनाच उत्सुकता आहे.

दोन निवडणुकांमधील मतदान

  • (२०१४)

  • एकूण उमेदवार : २७

  • एकूण मतदान : १,६२,३१९ (५८.३५ टक्के)

  • विजयी उमेदवार : प्रणिती शिंदे (४६,९०७ मते)

  • दुसऱ्या क्रमांकावर : तौफिक शेख (३७,१३८ मते)

  • तिसऱ्या क्रमांकावर : महेश कोठे (३३,३३४ मते)

  • चौथ्या क्रमांकावर : मोहिनी पत्की (२३,३१९ मते)

  • पाचव्या क्रमांकावर : नरसय्या आडम (१३,९०४ मते)

-------------------------------------------------------------

  • (२०१९)

  • एकूण उमेदवार : २१

  • एकूण मतदान : १,६८,२२१ (५५.६७ टक्के)

  • विजयी उमेदवार : प्रणिती शिंदे (५१,४४० मते)

  • दुसऱ्या क्रमांकावर : फारुक शाब्दी (३८,७२१ मते)

  • तिसऱ्या क्रमांकावर : महेश कोठे (३०,०८१ मते)

  • चौथ्या क्रमांकावर : दिलीप माने (२९,२४७ मते)

  • पाचव्या क्रमांकावर : नरसय्या आडम (१०,५०५ मते)

-------------------------------------------------------------------

(२०२४)

  • एकूण उमेदवार : २०

  • एकूण मतदार : ३,४६,६७७

  • उमेदवार : देवेंद्र कोठे (भाजप), चेतन नरोटे (काँग्रेस), फारुक शाब्दी (एमआयएम), नरसय्या आडम (माकप)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.