नितेश राणेंच्या बॅनर बाजीनंतर प्रसाद लाड भडकले, म्हणाले...

बॅनरबाजीवरून सोशल मीडियावर प्रचंड गदारोळ माजला आहे.
prasad lad
prasad ladesakal
Updated on

शिवसैनिक हल्ला प्रकरणानंतर आमदार नितेश राणे (Nitesh Rane) अज्ञातस्थळी आहेत. यावरून मुंबईत (Mumbai)बॅनर बाजीला काल रात्री(ता.३०) सुरुवात झाली. मुंबईतील चर्चगेट (Churchgate) या ठिकाणी नितेश राणे यांच्या फोटोसहीत एक बॅनर लावण्यात आले आहे. यात नितेश राणे हरवले आहेत त्यांच्या बद्दल माहिती देणाऱ्यास एक कोंबडी बक्षीस देण्यात येईल. असे नमूद केले आहे. या बॅनरबाजीवरून सोशल मीडियावर प्रचंड गदारोळ माजला आहे. यावरून भाजपचे प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी तात्काळ बॅनरबाजी करणाऱ्यांना अटक करावी अशी मागणी केली आहे. आज ते मुंबईत बोलत होते.

ते म्हणाले, राणेंच्या विरोधात सायन माटुंगा (Sion Matunga)परिसरात काल पोस्टर लावण्यात आले. हे पोस्ट लावणाऱ्या मुलांना आमच्या कार्यकर्त्यांनी पाहिलं आहे. याबाबत तक्रार देण्यासाठी आमचे कार्यकर्ते रात्री पोलिस स्टेशनला गेले, मात्र पोलिसांनी कोणतेही दाद दिली नाही. उद्या सकाळी एसिपी यांना भेटून सकाळी नोंद घेण्यात येईल असं सांगण्यात आलं. व्हिटीपर्यंत हे पोस्टर चिटकवण्यात आले आहे. याचा मी निषेध करतो. यावर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी प्रसाद लाड यांनी केली आहे.

prasad lad
Sindhudurg : बोलेरो गाडीचं कर्ज थकवणाऱ्यांना 101 नोटिसा पाठवणार

संतोष परब (Santosh Parab) यांच्यावरील हल्ल्यात नितेश राणे यांचे नाव समोर आले आहे. जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जमिनासाठी त्यांच्या वकिलांनी अर्ज सादर केला. या प्रकरणात वापरण्यात आलेले मोबाईल हस्तगत करणे आवश्यक आहे. असे कोर्टाने सांगितले आणि अर्ज नामंजूर केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.