Mumbai Bank Scam: तक्रारदारांनी अभ्यास करावा; प्रसाद लाड यांचे प्रत्यूत्तर

. मी पळून जाणारा नाही- प्रसाद लाड
prasad lad
prasad ladsakal media
Updated on

मुंबई बँकेवर प्रसाद लाड यांची निवड बेकायदा असल्याचा आरोप आम आदमी पक्षाचे राज्य सचिव धनंजय शिंदे (Dhananjay Shinde) व बँकिंग तज्ज्ञ विश्वास उटगी यांनी केला आहे. त्यांना प्रत्यूत्तर आमदार प्रसाद लाड (Prasad lad) यांनी दिले आहे. ज्यांनी तक्रार केली आहे त्यांनी अभ्यास करावा. मी पळून जाणारा नाही अशा शब्दात त्यांनी सुनावले.

मुंबई बँकेवर (Mumbai Bank Scam) पगारदार प्रवर्गातून निवडून आलेले आमदार प्रसाद लाड यांची निवड बेकायदा असल्याचा आरोप सहकार सुधार समितीतर्फे करण्यात आला. तसेच मुंबई बँकेत दोन हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोपही प्रसाद लाड यांच्यावर केला आहे. त्यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला.

Summary

ज्यांनी तक्रार केली आहे त्यांनी अभ्यास करावा. मी पळून जाणारा नाही अशा शब्दात त्यांनी सुनावले.

प्रसाद लाड म्हणाले, पगारदार वर्गातून आम्ही निवडून येतो. मी व्यावसायिक असलो तरीही कंपनीत मी पगारदारच असतो. ज्यांनी तक्रार केली आहे त्यांनी अभ्यास करावा. मला नोटीस आलेली नाही. नोटीस आली तर मी उत्तर देईल. मी पळून जाणारा नाही असे प्रत्यूत्तर प्रसाद लाड (Prasad lad) यांनी दिले.

प्रसाद लाड यांच्यावर काय आरोप आहे

पगारदार नोकरांच्या सहकारी पतसंस्थेच्या उपविधीनुसार सहकारी संस्थेचे सभासदत्व हे फक्त कायम कर्मचारी असलेल्या व्यक्तीलाच देण्यात येते, असा नियम आहे. प्रसाद लाड हे विधानपरिषदेचे आमदार तसेच व्यवसायाने उद्योजक आहेत. गेले अनेक वर्षे ते पगारदार नोकरदारांच्या सहकारी संस्थेतर्फे मुंबै बँकेवर निवडून आले आहेत. हे अत्यंत गंभीर असून जनतेची आणि विधान परिषदेची दिशाभूल करत आहे असा आरोप धनंजय शिंदे यांनी केला.

संचालक आमदार प्रसाद लाड यांनी स्वतःच्या कुटुंबाच्या मालकीच्या कंपनीत पगारदार नोकर असल्याचे दाखवून ते पगारदार नोकरांच्या पतसंस्था गटातून मुंबई बँकेवर निवडून येतात. या सर्वांविरुद्ध सहकार निबंधकांकडे तक्रारी केल्या होत्या. पण सहकार विभागाने त्या तक्रारीची दखलही न घेता या सर्वांना बँक निवडणुकीत पात्र उमेदवार म्ह्णून घोषित केले, असेही शिंदे म्हणाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.