अमरावती : कुठल्याही मंदिरात देवदर्शनासाठी गेल्यानंतर तिथं भाविकांना प्रसाद दिला जातो. या प्रसादामध्ये बऱ्याचदा लाडू, पेढा किंवा तत्सम आरोग्यदायी शाकाहारी पदार्थांचा समावेश असतो. पण अशा खाद्य पदार्थांऐवजी प्रसाद म्हणून पैशांचं वाटप केल्याचं तुम्ही कधी ऐकलंय का? ऐकलं नसेल तर आम्ही तुम्हाला असं एक मंदिर सांगणार आहेत जिथं प्रसाद म्हणून पैशांचं वाटप केलं जातंय. विशेष म्हणजे हे मंदिर महाराष्ट्रातील आहे. या पैशांच्या प्रसादाचं वाटप होत असल्याचा एक व्हिडिओ देखील समोर आला आहे.