Eknath Shinde: मुख्यमंत्र्यांना भावनिक पत्र लिहिणाऱ्या चिमुकल्याला मिळणार हक्काच घर

Eknath Shinde: मुख्यमंत्र्यांना भावनिक पत्र लिहिणाऱ्या चिमुकल्याला मिळणार हक्काच घर
Updated on

“सायेब, पैसे लवकर द्या, मग आई पुरणपोळ्या करंल, तुम्ही बी खायला या...’ अशा भावनिक आशयाचे पत्र शेतकऱ्याच्या मुलाने मुख्यमंत्र्यांना लिहीले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी या पत्राची गंभीर दखल घेतली आहे. हिंगोली जिल्हा परिषदेतील अधिकाऱ्यांनी चिमुकल्या प्रतापच्या घरी भेट दिली आणि त्याच्या व्यथा जाणून घेतल्या. (Pratap Of Hingoli Who Wrote An Emotional Lette, Will Get A House Eknath Shinde)

समाजकल्याण विभागाकडून प्रतापच्या शिक्षणाची जबाबदारी आणि कुटुंबाला घरकुल देण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. मुख्यमंत्री शिंदे यांनी कार्यालयातून हिंगोली जिल्हा परिषदेत फोन केला. त्यानंतर अधिकाऱ्यांनी प्रतापच्या घरी गोरेगावला भेट दिली व समाजकल्याण विभागाकडून प्रतापच्या शिक्षणाची जबाबदारी व कावरखे कुटुंबाला घरकुल देण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

चिमुकल्या प्रतापने काय म्हटले आहे पत्रात?

हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातल्या गोरेगाव येथील प्रताप जगन कावरखे या इयत्ता सहावीमधील मुलाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भावनिक पत्र लिहीलं होतं. या पत्रात अनुदानाची रक्कम लवकर मिळावी म्हणून त्याने "साहेब, पैसे लवकर द्या, मग आई पुरणपोळ्या करेल, तुम्हीही खायला या... दसऱ्याला पुरणपोळी खाल्ली नाही, दिवाळी तरी गोड करा' अशी आर्त हाक दिली होती.

जुलै महिन्यात पावसाचा जोर कायम होता. ढगफुटी व सततच्या पावसामुळे सर्वत्र शेतजमिनी खरडून गेली. त्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. बिकट परिस्थितीत शासनाच्या मदतीची अपेक्षा असताना सेनगाव तालुक्यातील चार मंडले अतिवृष्टी अनुदानातून वगळल्याने शेतकरी चिंतीत झाला आहे.

पोळ्य तर सोडा पैसेही नाहीत. तसेच जवळीच जयपूर गाातील एका शेतकऱ्याच्या मुलाने पैसे मागितल्यामुळे वडीलांनी फाशी घेतली. तेव्हा मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना सुखी ठेवाले आणिी अनुदान लवकर द्यावे अशी मागणीही या पत्रातून चिमूकल्याने केली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.