Pratibha Dhanorkar: भाजपचा सुपडा साफ नाही केला, तर नाव लावणार नाही... काँग्रेसच्या महिला खासदाराची डरकाळी

Vidhan Sabha Election: दरम्यान यावेळच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने राज्यासह देशभरात अनपेक्षित कामगिरी करत सुमारे 100 जागांवर विजय मिळवला आहे.
Pratibha Dhanorkar MP Chandrapur
Pratibha Dhanorkar MP ChandrapurEsakal
Updated on

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यात काँग्रेसने दमदार कामगिरी करत एका जागेवरून 13 जगांवर झेप घेतली. महाविकास आघाडीने एकत्र निवडणूक लढवत तब्बल 31 जागा जिंकल्या.

या निवडणुकीत भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांसह राज्यातील मंत्र्यांनाही पराभवाची चव चाखावी लागली. यामध्ये सर्वाधिक मताधिक्यांने पराभव स्वीकारावला लागला ते राज्यातील कॅबिनेट मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना. चंद्रपूरमधून आमदार प्रतिभा धानोरकर यांनी मुनगंटीवार यांचा 2 लाख 60 हजार मतांनी पराभव केला.

धानोरकरांची डरकाळी

लोकसभाचा निकाल लागल्यानंतर खासदार प्रतिभा धानोरकर यांनी मतदारसंघात आभार दौरा काढला. यामध्ये त्यांनी डरकाळी फोडत येत्या लोकसभा निवडणुकीत भाजपचा चंद्रपूर जिल्ह्यातून सुपडा साफ करणार असल्याचे म्हटले.

यावेळी बोलताना धानोरकर म्हणाल्या,"येत्या विधानसभेत जिल्ह्यातील सहा विधानसभेत मीच उमेदवार आहे असे समजून पक्षाचे काम करणार आहे. आणि यामध्ये सहाही विधानसभेत भाजपचा सुपडा साफ नाही केले तर प्रतिभा धानोरकर नावा लावणार नाही."

"आतापर्यंत काँग्रेसचे मंत्रिपद गडचिरोली जिल्ह्याला मिळत होते. पण यावेळी ते चंद्रपूर जिल्ह्याला कसे मिळेल यासाठी प्रयत्न करणार आहे," असेही खासदार धानोरकर यांनी स्पष्ट केले.

Pratibha Dhanorkar MP Chandrapur
Sunetra Pawar: सुनेत्रा पवार यांचा राज्यसभेसाठी अर्ज दाखल; केंद्रात मंत्रिपद मिळणार का? राष्ट्रवादीची खेळी नेमकी काय?

काँग्रेसमधील अंतर्गत वाद

दरम्यान, 2019 मध्ये लोकसभेच्या निवडणुकीत चंद्रपूरमधून बाळू धानोरक यांनी विजय मिळवला होता. मात्र, गेल्या वर्षी त्यांचे निधन झाले. त्यानंतर यंदाच्या लोकसभेत चंद्रपूरमधून लढण्यासाठी बाळू धानोरकर यांच्या पत्नी आणि वरोऱ्याच्या आमदार प्रतिभा धानोरक ईच्छुक होत्या. तर दुसरीकडे विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार त्यांची कन्या शिवानी वडेट्टीवार यांना तिकट मिळावे यासाठी प्रयत्न करत असल्याच्या चर्चा होत्या. त्यामुळे चंद्रपूर काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद निर्माण झाला होता. मात्र, अखेर पक्षाने धानोरकरांना संधी दिली आणि त्यांनी अडीच लाखांहून अधिक मतांनी विजय मिळवला.

Pratibha Dhanorkar MP Chandrapur
Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! विधानसभेला 'एकला चलो रे'चा नारा; २५० उमेदवार उभे करण्याची तयारी?

प्रतिकूल परिस्थितीत काँग्रेसचे शतक

दरम्यान यावेळच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने राज्यासह देशभरात अनपेक्षित कामगिरी करत सुमारे 100 जागांवर विजय मिळवला. तर महाराष्ट्रात काँग्रेसने महाविकास आघाडीच्या माध्यमातून 17 जागा लढवत 13 जागांवर विजय मिळवला. याचबरोबर सांगलीतून बंडखोरी करत अपक्ष म्हणून निवडून आलेल्या विशाल पाटील यांनी काँग्रेसला पाठींबा दिल्याने काँग्रेसच्या खासदारांची संख्या 100 झाली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.