दरेकरांच्या निशाण्यावर आघाडी सरकार म्हणाले, कोरोना काळात दारु....

सर्वोच्च न्यायालयाने महाविकास आघाडी सरकारला चपराक दिली
pravin-darekar-Uddhav-Thackeray
pravin-darekar-Uddhav-ThackerayTeam eSakal
Updated on

साक्री: कोरोनाच्या संकटकाळात जे दवा (औषध) देऊ शकले नाहीत, ते आता दारू देत आहेत, त्यामुळे आघाडी सरकारचा वाईन (Wine) विक्रीचा निर्णय चुकीचा आहे. अशी प्रतीक्रिया भाजपचे नेते प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांनी दिली. त्यांनी ट्विट करत महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. (Wine Selling in Super Market)

ट्विटमध्ये ते म्हणतात, बारा आमदारांच्या निलंबनप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने महाविकास आघाडी सरकारला चपराक दिली आहे. काही बाबींवरून कायद्याला जुमानायचे नाही असेच महाआघाडी सरकारने ठरविलेले दिसते. राज्यात अनेक प्रश्न आहेत. त्यात लक्ष द्यायला राज्य सरकारला (Mahavikas Aghadi) वेळ नाही. सरकार शेतकऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन कुणाचे भले करत आहेत हे सर्वांना ठाऊक आहे. गारपीट, अतिवृष्टीत शेतकऱ्यांना दमडी दिली नाही. कर्जमाफी झालेली नाही. असे पाप लपविण्यासाठी वाईनचे कारण पुढे केले जात असून राज्यात महिला, मुले या निर्णयाला विरोध करतील असा इशारा त्यांनी दिला. कोरोना (Covid19) काळात सामान्यांना दवा देता आली नाही. आता हे सरकार जनतेला दारु देत आहे असे ही ते म्हणाले.

pravin-darekar-Uddhav-Thackeray
Political : राऊत, परबांविरुद्ध चंद्रकांत पाटील याचिका दाखल करणार

साक्रीतील मोहिनी जाधव मृत्यू प्रकरणात पोलिसांनी जरुर तपास करावा परंतु ज्यापद्धतीने भाजपच्या पदाधिकार्‍यांना या प्रकरणात गोवले जात आहे ते योग्य नाही. साक्री नगरपंचायत भाजपची झाल्यानंतर अ‍ॅड.गजेंद्र भोसले यांचे नाव गोवून त्यांच्यावर दबाव आणण्याचे काम करु नये असे ही त्यांनी पोलिसांनी ठणकावून सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.