Pravin Darekar : जरांगेंनी घेतली ‘मविआ’ची सुपारी;भाजपच्या प्रवीण दरेकरांचा हल्लाबोल

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांच्या आंदोलनामागील छुपा अजेंडा महाराष्ट्रातील जनतेच्या तसेच मराठा समाजाच्या समोर आला आहे. मराठा समाजाच्या भावनांवर स्वार होऊन त्यांनी महाविकास आघाडीची सुपारी घेतली आहे, असा हल्लाबोल भाजपचे विधान परिषदेतील गटनेते प्रवीण दरेकर यांनी आज केला.
Pravin Darekar
Pravin Darekarsakal
Updated on

मुंबई: मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांच्या आंदोलनामागील छुपा अजेंडा महाराष्ट्रातील जनतेच्या तसेच मराठा समाजाच्या समोर आला आहे. मराठा समाजाच्या भावनांवर स्वार होऊन त्यांनी महाविकास आघाडीची सुपारी घेतली आहे, असा हल्लाबोल भाजपचे विधान परिषदेतील गटनेते प्रवीण दरेकर यांनी आज केला.

दरेकर म्हणाले की, जरांगे पाटील यांच्यात अहंकार आला आहे. त्यांची राजकीय महत्त्वाकांक्षा व सत्ताकारण लपून राहिलेले नाही. मराठा समाजाला वेठीस धरून, मराठा समाजाच्या भावनांवर स्वार होऊन महाविकास आघाडीची आणि काही जणांची सुपारी जरांगे यांनी घेतल्याचा आरोपही त्यांनी केला. तसेच, जरांगेंचा खेळ आता संपायला आला आहे. त्यामुळे त्यांचे मानसिक संतुलन ढासळू लागले आहे आणि ते वाटेल ते बोलायला लागले आहेत.

त्यांचे आव्हान आम्ही स्वीकारले आहे, असे प्रतिआव्हान दरेकर यांनी दिले. त्यांची सुरुवातीची भाषा कुणबी नोंदीसंदर्भात होती, त्यात सरकारने पुढाकार घेतला. त्यानंतर सगेसोयरेचा विषय आला, त्यावरदेखील सरकारने सकारात्मकता दाखवली. परंतु हा विषय धगधगत राहून विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला कशी मदत होईल, याची नियोजनबद्ध काळजी घेण्याचे काम जरांगे करीत आहेत, असा आरोप दरकेर यांनी केला.

जरांगे दोन ऑगस्टला न्यायालयात हजर होणार

नाट्यनिर्मात्याच्या फसवणूकप्रकरणी दाखल गुन्ह्याच्या मागील सुनावणीला हजर न राहिलेले मनोज जरांगे पाटील दोन ऑगस्टला न्यायालयात हजर राहतील, अशी माहिती त्यांच्या वकिलांनी बुधवारी न्यायालयास दिली. सुनावणीला हजर न राहिल्याने जरांगे यांच्याविरोधात प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. सी. बिराजदार यांनी मंगळवारी अटक वॉरंट काढले आहे. हे वॉरंट रद्द करण्याची विनंती त्यांचे वकील संतोष खामकर यांनी न्यायालयास केली. तब्येत बरी नसल्याने ते सुनावणीला हजर राहू शकले नाहीत. मात्र पुढील सुनावणीला ते हजर राहतील, असा युक्तिवाद खामकर यांनी केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com