'राज ठाकरेंच्या मताशी सहमत, राष्ट्रवादीमुळेच जातीवाद वाढला'

एका खाजगी वृत्तवाहिनीला दिलेला मुलाखतीत राष्ट्रवादीमुळे राज्यात जातीवाद वाढत गेला असा आरोप केला होता.
pravin darekar
pravin darekarpravin darekar
Updated on
Summary

एका खाजगी वृत्तवाहिनीला दिलेला मुलाखतीत राष्ट्रवादीमुळे राज्यात जातीवाद वाढत गेला असा आरोप केला होता.

औरंगाबाद: मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या मताशी मी सहमत असून राज्यात राष्ट्रवादीमुळेच जातीवाद वाढला आहे, असा घणाघात भाजप नेते प्रविण दरेकर (pravin darekar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर केला आहे. भाजप नेते दरेकर हे औरंगाबादच्या दौऱ्यावर आहेत, त्यांनी माध्यमांशी बोलताना राज ठाकरे (raj thackeray) जे बोलले ते खरे असल्याचे मत मांडले. काही दिवसांपूर्वी राज ठाकरेंनी एका खाजगी वृत्तवाहिनीला दिलेला मुलाखतीत राष्ट्रवादीमुळे राज्यात जातीवाद वाढत गेला असा आरोप केला होता.

मनसेची स्तुती-

मनसेचे कार्यकर्ते जवळ येत असतील तर चांगलंच आहे. मनसे एक जबाबदार पक्ष आहे, आमच्यात जर सलोख्याचे वातावरण होत असेल तर स्वागत आहे, असंही दरेकर म्हणाले. मागील काही दिवसांपूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि मनसे नेते राज ठाकरे यांची भेट झाली होती. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाल्याचा तर्कही अनेकांनी लावला होता. येणाऱ्या निवडणुकीत भाजप मनसेसोबत लढणार की नाही पुढील काळात कळेल. पण आता भाजपचे इतर नेतेही मनसेची स्तुती करत असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

pravin darekar
सहा जिल्ह्यांत कोरोनाचा प्रभाव ओसरला; बीड, उस्मानाबादमधील वाढ चिंताजनक

जनआशिर्वाद यात्रेमुळे कोरोना वाढणार नाही का, या प्रश्नावर बोलताना दरेकरांनी महाविकास आघाडी सरकारमधील पक्षांचे कार्यक्रम जमतात त्याठिकाणी कोरोना होत नाही का असा सवाल केला. औरंगाबादच्या दोऱ्यावर असणाऱ्या दरेकरांनी मनसेची स्तुती केल्याने दोन्ही पक्षात जवळीक वाढत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे भविष्यात महापालिका निवडणुकीत भाजप-मनसे एकत्र येऊ शकतात, असंही सांगितलं जातंय.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()