द्रौपदी मुर्मू यांना जाहीरपणे शिवसेनेनं समर्थन दिलंय - आदित्य ठाकरे

द्रौपदी मुर्मू यांना आम्ही त्यांना जाहीरपणे समर्थन दिलं असून मतदान केलं आहे - आदित्य ठाकरे
Aditya Thackeray
Aditya Thackerayesakal
Updated on
Summary

द्रौपदी मुर्मू यांना आम्ही त्यांना जाहीरपणे समर्थन दिलं असून मतदान केलं आहे - आदित्य ठाकरे

शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर केल्याप्रमाणे आम्ही राष्ट्रपती पदासाठी उभ्या असणाऱ्या एनडीएच्या उमेदवार मुर्मू यांना मतदान केलं आहे. याआधी देखील माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांना पाठिंबा दिला होता. आताही आमचा पाठिंबा होता, असं माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे. आज ते मुंबईत बोलत होते.

यावेळी ते म्हणाले, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहिर केलं होत की, कोणत्याही राजकीय पक्षासोबत आमचे राजकीय मतभेद असतील तरी एक महिला उमेदवार म्हणून मुर्मू या निवडणुकीसाठी पुढे आल्या आहेत. आम्ही त्यांना जाहीरपणे समर्थन दिलं असून मतदान केलं आहे. राष्ट्रपती हे सर्व राजकीय पक्षांपेक्षा मोठे पद असते. याआधीही आम्ही प्रतिभा पाटील यांना मतदान केलं आहे. योग्य व्यक्ती म्हणून पाठिंबा दिलेला असतो.

Aditya Thackeray
अमेरिकन तरुणीच्या अपहरणाचा २४ तासांत छडा, कहाणी ऐकून दिल्ली पोलिस आवाक्

आज राष्ट्रपती पदासाठी मतदान होतं आहे. निकालानंतर आदिवासी महिला राष्ट्रपती म्हणून जेव्हा मुर्मू या विजयी होतील तेव्हा या राज्यातील आदिवासी पाड्यांचा विकास होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. यावेळी मध्यप्रदेशातील बस दुर्गटनेसंदर्भात आदित्य ठाकरे म्हणाले की, या अपघातातील लोकांना लवकरात लवकर बाहेर काढण्यात यावं. मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यात झालेल्या एसटी बसच्या भीषण अपघाताची बातमी ऐकताच दुःख झाले आहे. अपघातग्रस्त कुटुंबांसोबत आमच्या सहवेदना असून जखमी प्रवासी लवकरात लवकर बरे होवोत, अशी प्रार्थना त्यांनी केली आहे.

Aditya Thackeray
वासू सपना, प्रेमरोग, आशिकी; शिंदे-फडणवीसांवर सेनेची फिल्मी टीका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.