Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी राजीनामा दिलेल्या हेमंत पाटलांना राष्ट्रपतींकडून समन्स

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी राजीनामा दिलेल्या हेमंत पाटलांना राष्ट्रपतींकडून समन्स
Updated on

नवी दिल्लीः मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन लोकसभा अध्यक्षांकडे राजीनामा दिलेले खासदार हेमंत पाटील यांना राष्ट्रपतींकडून समन्स पाठवण्यात आलेले आहेत. ४ डिसेंबर रोजी हजर राहण्याबाबत हे समन्स असल्याचं सांगितलं जातंय.

हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांनी २९ ऑक्टोबर रोजी मराठा आंदोलकांच्या मागणीनंतर राजीनामा दिला होता. त्यांनी ३१ ऑक्टोबर रोजी दिल्लीत महाराष्ट्र सदनामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर उपोषणही केलेलं होतं.

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी राजीनामा दिलेल्या हेमंत पाटलांना राष्ट्रपतींकडून समन्स
Chhagan Bhujbal : ''मी गावात जाणार, गावबंदी कराल तर शिक्षा होईल'', पाहणी दौऱ्यावर भुजबळांची प्रतिक्रिया

आता त्यांना संसदेत हजर राहण्यासाठी राष्ट्रपतींना समन्स पाठवलं आहे. हेमंत पाटील हे लोकसभेतील अनेक समित्यांवर आहेत. मात्र २९ ऑक्टोबर रोजी राजीनामा दिल्यामुळे ते एकाही बैठकीला हजर नव्हते. आता ४ तारखेला हजर राहण्यासंबंधी त्यांना समन्स धाडण्यात आलं. 'टीव्ही ९ मराठी'ने हे वृत्त दिले आहे.

दरम्यान, राज्यामध्ये मराठा आरक्षणावरुन रान पेटलेलं आहे. मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी ओबीसी प्रवर्गातूनच आरक्षण पाहिजे, ही भूमिका घेतलेली आहे. तर छगन भुजबळ यांनी मात्र या आरक्षणाला विरोध केलाय. दोन्ही बाजूंकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप होत आहेत.

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी राजीनामा दिलेल्या हेमंत पाटलांना राष्ट्रपतींकडून समन्स
Unseasonal Rain: शेकडो क्विंटल कांद्याचे अवकाळीने नुकसान ; समितीच्या अनास्थेमुळे शेतकऱ्यांना फटका

त्यातच गुरुवारी छगन भुजबळ यांच्या पाहाणी दौऱ्यावर येवल्यातच विरोध होतोय. अनेक गावकऱ्यांनी भुजबळांनी गावात येऊ नये, अशी भूमिका घेतलीय. तर भुजबळ यांनी जिथे बोलावणं होईल तिथे जाणार असल्याचं म्हटलं आणि जिथे विरोध होईल तिथे जणार नसल्याचं स्पष्ट केलंय. त्यापूर्वी त्यांनी दौऱ्यावर जाणारच अशी भूमिका घेतली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()