Raosaheb Danve : PM मोदींनी सहा महिनेआधीच केली होती कोरोनाची तयारी; दानवेंचा दावा

Narendra modi and Raosaheb Danve
Narendra modi and Raosaheb Danve
Updated on

जालना - केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे आपल्या बिनधास्त वक्तव्यांसाठी सर्वांना परिचीत आहे. अनेकदा त्यांच्या विधानामुळे वादही झालेले आहेत. आता दानवे यांनी नुकताच मोठा दावा केला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना येण्याच्या सहा महिने आधीच तयारी केली होती, असा दावा केला आहे. याबाबत टीव्ही९ या वृत्तवाहिनीने बातमी दिली आहे.

Narendra modi and Raosaheb Danve
Solar Energy : राज्यात सौरऊर्जेद्वारे ७००० मेगावॅट वीजनिर्मिती होणार

दानवे म्हणाले की, सरकार शेतकऱ्यांच्या अपेक्षा पूर्ण करते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ नंतर पीक विम्याचे नियम बदलले. तेव्हापासून शेतकरी विमा भरायला लागले. तसेच शेतकऱ्यांना विम्याची रक्काम मिळू लागली. दानवे पुढं म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना येण्याच्या सहा महिने आधीच तयारी केली होती.

यावेळी दानवे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर कडाडून टीका केली. उद्धव ठाकरे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलतात. पण त्यांनी हे तरी ठावूक आहे का? बटाटे जमिनीखाली येतात की, वर? हरभऱ्याचे घाटे कुठं येतात, हे ठावूक आहे का? असा हल्लाबोलही दानवे यांनी केला

Narendra modi and Raosaheb Danve
Amit Shah: केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा महाराष्ट्र दौरा अचानक रद्द! काय घडलंय नेमकं वाचा

युतीच्या वेळी मी, चंद्रकांत पाटील, देवेंद्र फडणवीस उपस्थित होतो. उद्धव ठाकरे आणि अमित शहा यांची बंददाराआड चर्चा झाली. त्यानंतर दोघेही अर्ध्या तासाच बाहेर आले. त्यानंतर युतीचा निर्णय झाला. भाजपचा मुख्यमंत्री होणार हे स्टेजवरून जाहीर केलं. त्यावेळी उद्धव ठाकरेंची दातखिळी बसली होती का, अशी जहरी टीकाही दानवे यांनी केला.

दरम्यान आपण खानदानी पाटील असून धोका देणार नाही. राज्य सरकार आणि केंद्र सरकार मोठ्यांकडून घेतं आणि गरिबांना देतं असा दावा दानवे यांनी केला. तसेच मी आणि सत्तार सर्वात गरिब असल्यांचं म्हणत आमच्यासारखी गरिबी सर्वांना यावी, अशी कोपरखळीही दानवेंनी लगावली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.