मुंबईः विविध विकासकामाचं भूमिपूज आणि लोकार्पण सोहळ्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबई दौऱ्यावर आहेत. राज्य शासनाच्या वतीने आयोजित कार्यक्रमामध्ये पंतप्रधानांसह राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांची उपस्थिती होती.
यावेळी पंतप्रधानांनी अटल सेतूवरुन झालेल्या टीकेचा धागा धरुन विरोधकांवर प्रहार केला. काही दिवसांपूर्वी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अटल सेतूच्या कामाच्या दर्जाबद्दल प्रश्न उपस्थित केले होते.
भाषणादरम्यान पंतप्रधान मोदी म्हणाले की, अटल सेतूमुळे 20 ते 25 लाख रुपयांचे इंधन वाचत आहे.. पनवेलला जाण्यासाठीचा वेळ वाचत आहे. महाराष्ट्रातलं महायुतीचं सरकार योग्य रितीने काम करत आहे, त्याचा मला आनंद आहे.
महाराष्ट्र सरकारने प्रत्येक वर्षी १० लाख तरुणांना कौशल्य प्रशिक्षण देण्याचा संकल्प केला असून या प्रशिक्षणादरम्यान शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. कौशल्य विकास प्रशिक्षण ही आपली गरज आहे. गेल्या चार ते पाच वर्षांत कोरोनासारख्या संकटानंतर भारतात रेकॉर्डब्रेक रोजगार निर्मिती झाली आहे. आरबीआयच्या रिपोर्टरनुसार देशात ८ कोटी नवे रोजगार उपलब्ध झाले आहेत.
पंतप्रधान पुढे म्हणाले की, विकासकामांच्या आकड्यांमुळे खोटा नरेटिव्ह पसरवू पाहणाऱ्या विरोधकांची बोलती बंद झाली आहे. हे विरोधक देशाच्या विरोधात आहेत.. त्यांची नीती विरोधात आहे, पण त्यांची पोलखोल होत आहे. लोक त्यांना नाकारत आहेत. जेव्हा कुठे पूल, रेल्वे ट्रॅक, रस्ता बनतो तर कुणा ना कुणाला रोजगार मिळतोच.. जशा पायाभूत सुविधा तयार होण्याचा वेग वाढतोय, तसे रोजगार वाढत आहेत. येत्या काळात गुंतवणूक वाढीमुळे या संधी वाढणार आहेत.
मोदी म्हणाले की, नव्या सरकारच्या शपथविधीनंतर आम्ही गरिबांना पक्की घरं देण्याचा निर्णय घेतला, आत्तापर्यंत ४ कोटी गरिबांना घरे दिली आहेत. येत्या काळात ३ कोटी लोकांना घरे देणार आहोत, यामध्ये महाराष्ट्रातील दलित, गरिब व मागासवर्गीय लोक असतील. ९० लाख कर्ज प्रकरणं हे फेरीवाल्यांसाठी दिले आहेत.. त्यातील १३ लाख कर्ज वितरण हे महाराष्ट्रातील, तर दीड लाख कर्ज हे मुंबईतील आहेत, असं मोदींनी सांगितलं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.