Prisoner : कैद्यांसाठी मोठी बातमी! आता तुरुंगात मिळणार 'या' सुविधा

तुरुंग विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेतच्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
prison
prison sakal
Updated on

Prisoner : तुरुंगातील कैद्यांसाठी एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. तुरूंगात देण्यात येणारी ही सेवा पन्नस वर्षापेक्षा अधिक वय असलेल्या ज्येष्ठ कैद्यांना दिली जाणार आहे.

prison
Sanjay Raut: "शरद पवारांना समजून घ्यायला शंभर जन्म घ्यावे लागतील"; राऊतांचा भाजपला टोला

आत्तापर्यंत तुरुंगात कैद्यांना झोपण्यासाठी ताडपत्री किंवा चादर दिली जात होती. मात्र, आता या परंपरेत बदल करण्यात आला असून, आता कैद्यांना उशी आणि बेड दिला जाणार आहे.

या निर्णयानुसार आता तुरूंगातील कैद्यांना उशी आणि बेड वापरण्यास मिळणार आहे. जेल प्रशासनाचे अॅडिशनल डीजी अमिताभ गुप्ता यांनी मंगळवारी यासंदर्भात माहिती दिली.

prison
MPSC Protest : विद्यार्थ्यांच्या मागण्यांबद्दल CM शिंदेंनी निवडणूक आयोगाला लिहिलं पत्र; ऐका त्यांच्याच तोंडून...

का घेण्यात आला निर्णय?

अमिताभ गुप्ता यांनी तुरुंग विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली होती, या बैठकीत काही कैदी हे विविध आजारांनी त्रस्त असल्याची माहिती देण्यात आली. आजारपणामुळे हे कैदी नीट झोपू शकत नसल्याचेही अधिकाऱ्यांनी निदर्शनास आणून दिले.

त्यानंतर, ५० वर्षापैक्षा अधिक वय असलेल्या कैद्यांना उशी आणि बेड वापरण्यास परवानगी देण्याचा निर्णय देण्यात आला आहे.

prison
Alia Bhatt : मुंबई पोलिसांनी आलिया भट्टशी साधला संपर्क! म्हणाले, "तक्रार करा..."

परंतु, ही सर्व साधने कैद्यांना स्व-खर्चाने आणायची आहेत. यासाठी उशी आणि बेडची साईजही निश्चित करण्यात आली आहे. राज्यात तुरूंगात सध्या वायाची पन्नाशी ओलांडलेल्या कैद्यांची संख्या जवळपास ३ ते ४ हजार एवढी आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()