कऱ्हाड : केंद्र सरकारकडून राज्याला पर्याप्त प्रमाणात लशीचा पुरवठा होत नाही. ही बाब अत्यंत गंभीर आहे. राज्याची स्थिती लक्षात घेऊन केंद्राने तो पुरवठा वाढवला पाहिजे, यासाठी पाठपुरावा सुरू आहे, अशी माहिती माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली. लोकसंख्येच्या प्रमाणात होणारा लस पुरवठा रद्द करून रुग्णांच्या प्रमाणात लस पुरवठा करण्यासाठी पाठपुरवा सुरू आहे, असे श्री. चव्हाण यांनी या वेळी स्पष्ट केले.
श्री. चव्हाण म्हणाले, ""कोरोनाची स्थिती वाढल्याने शासकीय जुनी कोरोना केंद्र सुरू करत आहोत. अकस्मात कोरोना केंद्राची सध्या गरज नाही. मागील वर्षी एप्रिल ते सप्टेंबर काळात लाट होती. याही वेळी तीच स्थिती आहे. लसीकरणासाठी केंद्र उघडलेली आहेत. लसीकरणाचे आकडे पाहिले तर त्याची केंद्र वाढवली आहेत. सर्व उपजिल्हा रुग्णलयात लस दिली जाणार आहे. मात्र, पर्याप्त प्रमाणात लस उपलब्ध होत नाही. दुसऱ्या लाटेची फटका महाराष्ट्राला बसला आहे. केंद्राने जास्तीतजास्त लशीचा पुरवठा केला पाहिजे. लोकसंख्येपेक्षा रुग्णांच्या प्रमाणात लस पुरवठा व्हावा, यासाठी राज्य सरकारचा पाठपुरवा सुरू आहे. लसीकरण वाढवण्यासाठी राज्याच्या हकीन्स कंपनीला भारत बायोटिकची कोविडची लस तयार करण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती राज्य सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. त्यांना सर्व टेक्नालॉजी व रॉ मटेरियल द्यावे, तसे झाल्यास गतीने लस निर्मिती होऊ शकते. केंद्राकडून मान्यतेसाठी पाठपुरावा सुरू आहे.''
वाझे प्रकरणाची मुख्यमंत्र्यांकडून दखल
पोलिस अधिकारी सचिन वाझे यांच्या प्रकरणात राज्य सरकारवर गंभीर आरोप झाले आहेत, हे खरे आहे, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी नमूद केले. सरकारवर आरोप गंभीर आहेत. त्याबाबत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही चिंता व्यक्त केली आहे. त्या सगळ्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही गंभीर दखल घेतली आहे. आता ते प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. त्याबाबत योग्य निर्णय होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
थकबाकीदारांनाे! दुकानगाळे सील करण्याची माेहीम सुरुच राहणार; सातारा पालिकेचा इशारा
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.