Prithviraj Chavan : काँग्रेसच्या अंतर्गत राजकारणावर पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, काँग्रेसमध्ये…

सत्यजित तांबे यांच्या आरोपाबाबत पृथ्वीराज चव्हाण म्हणाले पक्ष योग्य तो निर्णय घेईल
Prithviraj Chavan
Prithviraj ChavanEsakal
Updated on

नाशिक पदवीधर मतदारसंघातून तांबे मोठ्या मताधिक्क्याने निवडून आले आहेत. नाशिक पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत ऐनवेळी काँग्रेसचा एबी फॉर्म न जोडता अपक्ष फॉर्म भरल्यामुळे सत्यजित तांबे यांच्यावरून वाद निर्माण झाला. त्यांच्या या भूमिकेनंतर त्यांना काँग्रेस पक्षाने निलंबीत केले. या सर्व घडामोडी घडत असताना सत्यजित तांबे यांचे मामा म्हणजेच काँग्रेसचे जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्यावर शस्त्रक्रिया केल्याने ते या सर्व घडामोडींपासून लांब होते.

काल त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. बाळासाहेब थोरात बोलताना म्हणाले की, मधल्या काळात खूप राजकारण झालं. मधल्या काळात सत्तांतर झालं त्यावेळी पासून तालुक्यावर सूड उगवला जात आहे. कार्यकर्त्यांना त्रास दिला जात आहे. चांगले चालू असणारे उद्योग व्यवसाय बंद पाडले जात आहेत. आपण संघर्षातून मोठे झालो आहोत. या संघर्षातून आपण बाहेर येऊ आणि आणखी नव्या उमेदीने उभं राहू. त्याचबरोबर आता विधान परिषदेच्या निवडणुकीत मोठं राजकारण झालं तरीदेखील सत्यजित मोठ्या मताने विजयी झाला असं तर म्हणाले आहेत.

Prithviraj Chavan
Kasaba Bypoll: टिळकांना उमेदवारी देतो, दोन्ही निवडणूका बिनविरोध करा? चंद्रकांत पाटलांची गुगली

त्यावर आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भाष्य केलं आहे. एकीकडे काँग्रेसचे हाथ से हाथ जोडो अभिनयान सुरू आहे तर सत्यजित तांबे यांनी काँग्रेस कमिटीवर गंभीर आरोप केले आहे. यावर चव्हाण म्हणाले की, काँग्रेसमध्ये भरपूर लोकशाही आहे, हीच अडचण आहे. शिस्त पाळली पाहिजे. काही झाले तर चर्चा केली पाहिजे, तर सत्यजित तांबे यांच्या आरोपाबाबत वरिष्ठ पातळीवर चौकशी योग्य स्तरावर होईल, असंही त्यांनी म्हंटलं आहे.

सर्व गोष्टींचा विचार करून चर्चा केली जाईल. शिस्त पाळली पाहिजे. काही झाले तर चर्चा केली पाहिजे, तर सत्यजित तांबे यांच्या आरोपाबाबत वरिष्ठ पातळीवर चौकशी योग्य स्तरावर होईल असंही त्यांनी यावेळी म्हंटलं आहे.

Prithviraj Chavan
Balasaheb Thorat : 'जे झालं ते व्यथित करणारं होतं, मी अन् पक्ष बघून घेऊ', थोरात स्पष्टच बोलले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.