असदुद्दीन ओवैसी यांची मानसिकता भाजपपेक्षा वेगळी नाही - प्रियंका चतुर्वेदी

मुस्लिम महिलांचा लिलाव होत होता त्यावेळी हैदराबादचे खासदार गायब होते?
Priyanka Chaturvedi
Priyanka Chaturvedi esakal
Updated on

मुंबई : शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांच्या वधू विषयीच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. वधूच्या बाबतीत त्यांचा उत्साह आताही असल्याचा टोला त्यांनी ओवैसी यांना लगावला. शनिवारी भिवंडीतील सभेला संबोधित करताना राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनेवर एकाच वेळी निशाणा साधला. ओवैसी म्हणाले, शिवसेना आणि भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी २०१९ मध्ये महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत एमआयएमला मतदान करायला सांगितले होते. मात्र राष्ट्रवादीने निवडणुकीनंतर उद्धव ठाकरेंच्या पक्षाबरोबर लग्न केले. त्यानंतर ओवैसी म्हणाले, तीन पक्षांमध्ये वधू कोण आहे हे मला माहीत नाही. (Priyanka Chaturvedi Criticize Asadudddin Owaisi On Bride Remark)

Priyanka Chaturvedi
दोन कोटी नोकऱ्या देणार होता, त्याच काय झालं? राऊतांचा मोदी सरकारला सवाल

असदुद्दीन ओवैसी यांच्या या टीकेला प्रियंका चतुर्वेदी (Priyanka Chaturvedi) यांनी ट्विट करुन प्रत्युत्तर दिले आहे. त्या म्हणाल्या, ओवैसी यांचे वधूविषयी वेडेपण सुरुच आहे. अगोदर मुघल पत्नींबरोबर आणि आता भिवंडीत. आभासी दुनियेत बुली बाई आणि सुली डिल्स सारख्या अॅपवर मुस्लिम महिलांचा लिलाव होत होता त्यावेळी हैदराबादचे खासदार गायब होते, असा टोला चतुर्वेदी यांनी लगावला. असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांची मानसिकता भाजपपेक्षा वेगळी नाही. वास्तविक भिवंडीत असदुद्दीन ओवैसीने देशात चालु असलेल्या मंदिर-मशिद विवादावर म्हणाले होते, की भारत कोणत्या एका समाजाचा नाही.

Priyanka Chaturvedi
मुंबईतील शिवसेना रुजली कोकणी जनतेमुळे

भारत द्रविड आणि आदिवासींचा आहे. ते म्हणाले, हा भारत ना माझा आहे, ना उद्धव ठाकरेंचा, ना नरेंद्र मोदींचा, ना अमित शहांचा आहे. जर भारत कोणाचा असेल तर तो द्रविड आणि आदिवासींचा आहे. लोक वेगवेगळ्या ठिकाणांहून आले होते. मात्र भाजप मुघलांच्या मागे आली होती. जर कोणी पंतप्रधान नरेंद्र मोदी, उद्धव ठाकरे, शरद पवार किंवा योगी आदित्यनाथ यांच्याविरोधात बोलला तर त्याच्या विरोधात कडक कारवाई केली जाते. मात्र कोणी आमच्या आस्थेविरोधात काही बोलला तर त्याच्यावर कायदेशीर कारवाईही होत नाही, असे ओवैसी म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.