Hari Narake Daughter Reaction : 'तुमच्यात हिंमत असेल तर विचारांनी उत्तर द्या....' हरी नरके यांच्या मुलीची रोखठोक प्रतिक्रिया!

यासगळ्यात नरके यांच्या मुलीची प्रमितीची प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यात तिनं टीका करणाऱ्यांचा सणसणीत उत्तर दिलं आहे.
Hari Narke Death Update NCP leader Chhagan Bhujbal on demise of dr Hari Narke
Hari Narke Death Update NCP leader Chhagan Bhujbal on demise of dr Hari Narke esakal
Updated on

Pro Hari Narake Passed away age 60 : महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचारांचा प्रचार अन् प्रसार करण्यात मोलाचे योगदान दिलेले साहित्यिक आणि पुरोगामी विचारविश्वातील चळवळीतील प्रसिद्ध व्यक्तिमत्व प्रा. हरी नरके यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. नरके यांच्या निधनानंतर काही नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारच्या पोस्ट केल्या होत्या.

अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने मुंबई एज्युकेशन ट्रस्ट,भुजबळ नॉलेज सिटी,बांद्रा येथे शोक सभेचे आयोजन करण्यात आले होते. नरके यांच्या श्रद्धांजली सभेत तिनं टीका करणाऱ्यांना उत्तर दिलं आहे. नरके सरांच्या मृत्यूनंतरही त्यांच्यावर करण्यात आलेल्या टीकेनं अनेकांनी त्या सोशल मीडियावर व्हायरल पोस्टचा निषेध केला होता. त्यावर काही जणांनी टीका करणाऱ्यांना चांगलेच खडसावले होते.

Also Read - दिल्लीतल्या केवळ प्रशासकीय बदल्यांपुरतंच मर्यादित नाही, दिल्ली सेवा विधेयक. काय आहेत

यासगळ्यात नरके यांच्या मुलीची प्रमितीची प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यात तिनं टीका करणाऱ्यांचा सणसणीत उत्तर दिलं आहे. प्रमितीनं बाबांवर बोलणाऱ्यांना चांगलेच खडसावले आहे. याशिवाय तिनं बाबांसोबतच्या काही आठवणींना उजाळाही दिला आहे. आपल्या प्रतिक्रियेमध्ये ती म्हणते, बाबा काम करत असताना शनिवार-रविवारच्या सुट्टीतही ते दौरे करायचे.

२४ तासांपैकी २५ तास किमान वाचन करायला हवं असं बाबा म्हणायचे. जेवण आणि अंघोळी व्यतिरिक्त त्यांना कधीच पुस्तक हातात नाही, असं त्यांना कधीच बघितलं नाही. मला अभिनयाची आवड असताना त्यांनी मला ललित क्रीडामध्ये प्रवेशासाठी त्यांनी ओबीसीमधून प्रवेश घेऊ दिला नाही. ओपनमधून प्रवेश केला आणि मला बाहेर पडताना गोल्ड मेडल मिळालं.

विरोधकांना या घटनेचा आनंद झाला. तुमच्यात धमक असेल तर विचारांनी त्याला उत्तर द्या… त्यांच खंडण करुन दाखवा. तुमच्या टीकेने काही फरक पडत नाही. याउलट माझे बाबा मोठे होत आहे. मी हरी नरके यांची मुलगी आहे… माझ्या क्षेत्रात मी त्यांचा वारसा पुढे नेईल. एका गोष्टीची खंत आहे. ती म्हणजे मी जो सिनेमा लिहिला… तो बाबांनी बघायचा राहिला. अशा शब्दांत प्रमितीनं तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

Hari Narke Death Update NCP leader Chhagan Bhujbal on demise of dr Hari Narke
Viral Video : जैसे ज्याचे कर्म तैसे...! भर रस्त्यात तरूणीची काढली छेड अन् क्षणात मिळाला चोप; घटना CCTV मध्ये कैद

मराठी विचारविश्वामध्ये आपल्या साहित्यानं, लेखणानं आणि वक्तृत्वानं वेगळं स्थान निर्माण करणाऱ्या प्रा.हरी नरके यांचे ९ ऑगस्ट यांचे हदयविकाराच्या झटक्यानं निधन झाले. ते ६० वर्षांचे होते. त्यांच्या जाण्यानं महाराष्ट्राच्या सामाजिक आणि वैचारिक क्षेत्राची मोठी हानी झाल्याच्या प्रतिक्रिया मान्यवरांनी दिल्या होत्या.

Hari Narke Death Update NCP leader Chhagan Bhujbal on demise of dr Hari Narke
Hari Narake : महात्मा फुलेंच्या बदनामी प्रकरणी पुस्तक लिहिण्याची सुचना पुलंनी केली! नरकेंनी सांगितली होती आठवण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.