'दिशा सालियन प्रकरणात मंत्र्याचा सहभाग, आमच्याकडे पुरावा'

दिशा सालियन प्रकरणात राज्यातील एक मंत्री सहभागी असल्याचा गंभीर आरोप नितेश राणे यांनी केलाय.
Nitesh Rane
Nitesh Raneesakal
Updated on

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर सातत्याने दिशा सालियनच्या आत्महत्येवर भाजप आमदार नितेश राणे यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले होते. काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनीदेखील दिशा सालियनची बलात्कार करून हत्या झाली असल्याचा आरोप केला होता या प्रकरणावर आता पुन्हा नितेश राणे यांनी विधानसभेत बोलताना धक्कादायक खुलासा केलाय. (Proof of Disha Salian's murder will soon give pen drive to CBI through court, Nitesh Rane said in Assembly)

नितेश राणे विधानसभेत बोलताना म्हणाले, “दिशा सालियनची आत्महत्या नव्हे हत्याच झाली, याचा पुरावा आहे.... लवकरच कोर्टाच्या माध्यमातून सीबीआयकडे पेन ड्राइव्ह देणार.” ते पुढे म्हणाले, “ दिशा सालियनची खरीच आत्महत्या असेल तर त्या इमारतीतील सिसीटिव्ही फुटेज का गायब केले. तेथील वॉचमॅन गायब. त्यामुळे ही आत्महत्या आहे, हे मी जबाबदारीने सांगतो”

Nitesh Rane
मुंबईत आमदारांना मोफत घर? आव्हाडांनी दिले उत्तर

पेनड्राइव्ह चा जमाना आहे, म्हणून या प्रकरणी संवादाचा पेनड्राइव्ह आहे. या दिशा सालियन प्रकरणात राज्यातील एक मंत्री सहभागी असल्याचा गंभीर आरोप नितेश राणे यांनी केलाय. हा पेनड्राइव्हचा पुरावा लवकरच कोर्टाच्या माध्यमातून सीबीआयकडे देणार असल्याचेही ते म्हणाले.

Nitesh Rane
MPSC कडून PSI चा अंतिम निकाल जाहीर, 494 नवे अधिकारी होणार दाखल

दिशा सालियान मृत्यु प्रकरण

सेलिब्रिटी मॅनेजर दिशा सालियानचा इमारतीवरून पडून मृत्यू झाला होता. मालाड येथील एका मोठ्या इमारतीच्या १२ व्या मजल्यावरून खाली पडून तीचा मृत्यू झाला. सुरुवातीला तिने आत्महत्या केल्याचं म्हटलं जात होतं. पण त्यानंतर तीने दिशाने मद्यपान केलं होतं आणि या नशेत असताना ती घराच्या गॅलरीतून खाली पडली, असे पोलीस तपासात समोर आले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिशा आपल्या आई- वडिलांसोबत दादरमध्ये राहत होती. सोमवारी रात्री ती आपल्या काही मित्र- मैत्रिणींना भेटायला मालाडला आली होती. अभिनेता रोहन रॉय याच्या १२ व्या मजल्यावरील घरी ती गेली होती. जवळपास ६ लोक या घरात उपस्थित होते. रात्रीच्या जेवणानंतर सगळे मद्यपान करायला बसले. दिशाही मद्यधुंद अवस्थेत होती. यातच ती खिडकीजवळ गेली आणि जवळपास रात्री १ वाजता तोल जाऊन ती १२ व्या मजल्यावरून खाली पडली. यातच २८ वर्षीय दिशाचा मृत्यू झाला, असे पोलीस तपासात समोर आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.