आज महाज्योती पीएचडी फेलोशिपसाठी होणारा पेपर फुटल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. आज पुणे, नागपूरमध्ये परिक्षा केंद्रावर मोठा गोंधळ उडाला. विद्यार्थ्यांनी वारंवार होणाऱ्या पेपर फुटीवर संताप व्यक्त केला आहे. अशातच विद्यार्थ्यांनी पेपर फुटल्याचा आरोप करत परिक्षेवर बहिष्कार टाकला आहे. आज नागपुरमधील कमला नेहरु विद्यालय, पुण्यातील श्रीमती काशीबाई नवले अभियांत्रिकी महाविद्यालय या केंद्रांवर मोठा गोंधळ निर्माण झाला.
परीक्षा केंद्रावर सकाळी परीक्षेला सुरुवात झाली. मात्र विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका दिली असता ती सीलबंद लिफाफ्यात नसल्याने विद्यार्थ्यांनी त्यावर आक्षेप घेतला. त्यानंतर ए आणि बी या दोन ग्रुपची प्रश्नपत्रिका ही सीलबंद लिफाफ्यात होती. मात्र सी आणि डी या ग्रुपची प्रश्नपत्रिका ही खुली होती. त्यामुळे पेपर विद्यार्थ्यांना देण्याआधीच फोडण्यात आला असा आक्षेप परीक्षार्थी उमेदवारांनी घेतला.
पेपर छापील नसून झेरॉक्स काढलेले होते असा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. पेपरला सील नसल्याने पेपर न घेता सरसकट सर्वांना फेलोशिप देण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. अजित पवार पी.एच.डी करून काय दिवे लावणार आहे का असं म्हणाले होते, यांनी किमान पेपरला सील लावावे असं म्हणत विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला आहे.
दुरवरून आलेल्या विद्यार्थ्यांना दुसऱ्यांदा हा फटका बसल्याने विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला आहे. दुसरीकडे बाहेरून येणाऱ्या आणि गोंधळ घालणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलीसांनी रोखलं आहे. गोंधळ करत ठिय्या देण्याचा प्रयत्न करत असणाऱ्या काही विद्यार्थ्यांना पोलिसांनी थांबवले. तर काही जण घोषणा देत होते त्यांना बाहेर काढले. कॉलेजकडून या प्रकारावर चर्चा सुरू आहे.
विरोधकांचा अजित पवारांसह सरकारवर हल्लाबोल
पेपरफुटीच्या प्रकरणावर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांसह राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे. या प्रकरणी विजय वडेट्टीवार यांनी सोशल मिडीयावर पोस्ट लिहली आहे. 'उपमुख्यमंत्री अजित पवारांनी विचारले होते पी.एच.डी करून दिवे लावणार का?'.
'प्रामाणिक परीक्षार्थींनी दिवे लावू नये म्हणून थेट आज पी.एच.डी फेलोशीपचा पेपर फोडण्याचे कारस्थान केले का? पुणे, नागपूर इथे पेपरफुटीची घटना समोर आली आहे'.
'एक मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री असलेलं महायुती सरकार काय काय दिवे लावत आहे, हे महाराष्ट्रातील जनता आणि युवा बघत आहे. ही परीक्षा दोन वेळा घेतली आणि दोन्ही वेळा घोळ घालण्यात आला आहे'.
'आरोपींवर कारवाईची मागणी केली तर गृहमंत्री साहेब पुरावे आणून द्या म्हणतात...तलाठी परीक्षेच्या निकालावर प्रश्न उपस्थित केले तर महसूल मंत्री कारवाईची धमकी देतात! आता यावेळी कारवाई करा, परीक्षार्थींना धमकी देऊ नका!', असं आपल्या पोस्टमध्ये विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.