Maratha Reservation : मराठा आंदोलकांकडून सरकारचा निषेध! तिरडीवर टरबूज ठेवून काढली अंत्ययात्रा

Maratha Reservation
Maratha Reservation
Updated on

Chhatrapati Sambhaji Nagar News - राज्यात मराठा आऱक्षणाचा मुद्दा चांगलाच चिघळला आहे. प्रमुख पक्षांचे नेते आंदोलनस्थळी भेट देत आहेत. त्याचवेळी राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मराठा आंदोलकांवर केलेल्या लाठीचार्जबद्दल निषेध नोंदवण्यात येत आहे. जिल्हा बंदची हाक देत सरकारचा निषेध करण्यात येत असून फुलंब्री तालुक्यात अंत्ययात्रा काढून सरकारचा निषेध नोंदवण्यात आला.

Maratha Reservation
Maratha Reservation : संसदेच्या विशेष अधिवेशनात मराठा, धनगर आरक्षणाचा प्रश्न कायमचा सोडवा; रोहित पवारांची मागणी

अंतरवाली सराटी येथे मराठा आंदोलकांवर पोलिसांकडून अमानुष लाठीचार्ज करण्यात आला होता. यामध्ये अनेक आंदोलक जखमी झाले आहे. मागील अनेक वर्षांपासून आरक्षणाची मागणी करण्यात येत आहे. मात्र सर्वोच्च न्यायालयाने मराठा आऱक्षणावरील याचिका फेटाळून लावली आहे. त्यामुळे आरक्षणाचा प्रश्न रेंगाळला आहे.

दरम्यान फुलंब्री येथे अंतरवाली सराटी येथील घटनेचा निषेध म्हणून मराठा समाज बांधवांनी तिरडीवर टरबूज ठेवून सरकारचा जाहीर निषेध करीत अंत्ययात्रा काढण्यात आली. अंत्ययात्रा वाजतगाजत काढण्यात आली. यावेळी पोलिस देखील घटनास्थळी उपस्थित होते.

(Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.