Pulwama Attack : संजय राऊत घेणार सत्यपाल मलिकांची भेट; म्हणाले देशाची सुरक्षा...

Sanjay Raut and satyapal malik
Sanjay Raut and satyapal malik
Updated on

मुंबई : जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी पुलवामा हल्ल्यासह अनेक मुद्द्यांवर खळबळजनक खुलासे केले होते. यावरून देशात राजकीय खळबळ उडाली आहे. यावरून विरोधी पक्षांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. त्यातच उद्धव ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी सत्यपाल मलिक यांची भेट घेणार असल्याचं म्हटलं.

Sanjay Raut and satyapal malik
Sharad Pawar: एकिकडे अजित पवारांच्या CM पदाची चर्चा तर दुसरीकडे राष्ट्रवादीत मोठ्या बदलांचे संकेत

संजय राऊत म्हणाले की, गरज मी दिल्लीमध्ये अनेक भेटीगाठी घेणार आहे. त्यात जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांना भेटणार आहे. पुलवामाबाबत त्यांनी जे काही खुलासे केले आहेत, ते राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे. तो संपूर्ण विषय देशात पोहचू नये, यासाठी माध्यमांवर दबाव आणण्यात आला. पुलवामा हत्याकांडात काही गरबड असेल तर तो विषय वेगळ्या पद्धतीने जास्तीत जास्त देशात जायला हवा, असं राऊत यांनी म्हटलं.

Sanjay Raut and satyapal malik
CM पदावरुन राष्ट्रवादीत घमासान; आता अमोल कोल्हे म्हणतायत जयंत पाटील...

सत्यपाल मलिक हे महत्त्वाचे नेते आहेत. ते सध्या सक्रिय आहेत, राजकारणात. देशाच्या पुढील राजकारणात त्यांची काय मदत होऊ शकते, हे समजून घेणं आवश्यक आहे. आमचा आणि त्यांचा संवाद अनेक दिवसांपासन सुरू आहे. त्यामुळे दिल्लीत त्यांना भेटणार आहे, असं राऊत यांनी म्हटलं.

सत्यपाल मलिक यांनी आरोप केला होता की पुलवामा दुर्घटना केंद्राच्या चुकीमुळे घडली होती. कारण केंद्र सरकारकडून सैन्याला हवाई वाहतूक करण्यास नकार देण्यात आला होता. त्यामुळे काँग्रेस आणि आप नेत्यांनीही याप्रकरणी केंद्र सरकारला घेरले आहे.


सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.