मोठी बातमी! ..अखेर ऊसदराची कोंडी फुटली, राजू शेट्टींचं चक्काजाम आंदोलन मागे; 'इतक्या' रुपयांवर निघाला तोडगा

शिरोली येथील पुलावर काल तब्बल आठ तास केलेल्या चक्काजाम आंदोलनानंतर ऊसदराची कोंडी फुटली.
Pune Bangalore Highway Chakka Jam Andolan Raju Shetti
Pune Bangalore Highway Chakka Jam Andolan Raju Shetti esakal
Updated on
Summary

कोल्हापुरातील आंदोलन यशस्वी झाल्यानंतर शेट्टी यांनी आपला मोर्चा सांगली जिल्ह्यातील कारखान्यांकडे वळवला आहे. सांगलीतील कारखान्यांनी अद्यापही दर जाहीर केलेला नाही.

कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील (Pune-Bangalore National Highway) शिरोली येथील पुलावर काल (गुरुवार) तब्बल आठ तास केलेल्या चक्काजाम आंदोलनानंतर (Sugarcane Rate Chakka Jam Andolan) ऊसदराची कोंडी फुटली. त्यामुळे आता शेतांतून कोयता चालणार आहे.

गेल्यावर्षीच्या हंगामामध्ये प्रतिटन ३००० रुपये पेक्षा जास्त दर दिलेल्या साखर कारखान्यांकडून प्रतिटन ५० रुपये, तर त्यापेक्षा कमी दर देणाऱ्यांकडून १०० रुपये दुसरा हप्ता दोन महिन्यांनंतर दिला जाणार आहे. तसेच, यावर्षीच्या गळीत हंगामात प्रतिटन ३१०० रुपये पहिला हप्ता देण्यात येणार असल्याचे सांगून चक्काजाम आंदोलन मागे घेतल्याची घोषणा माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली.

Pune Bangalore Highway Chakka Jam Andolan Raju Shetti
Dhangar Reservation : धनगर आरक्षण मिळेपर्यंत खांद्याला खांदा लावून लढणार; भाजप आमदाराची उपोषणस्थळी ग्वाही

दरम्यान, गेल्यावर्षीच्या उसासाठी प्रतिटन शंभर व पन्नास रुपये देण्यासाठी सर्व कारखान्यांकडून सहमती पत्र घेतले जाणार आहे. जोपर्यंत हे सहमतीचे पत्र देत नाहीत, तोपर्यंत साखर कारखाने सुरू करू दिले जाणार नाहीत, असा इशारा श्री. शेट्टी यांनी दिला. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीनंतर आंदोलनस्थळी येऊन ऊसदराची कोंडी फुटल्याचे श्री. शेट्टी यांनी जाहीर करताच कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर गुलालाची आणि फुलांची उधळण करून, तसेच फटाके फोडून जल्लोष केला.

Pune Bangalore Highway Chakka Jam Andolan Raju Shetti
कोयना धरणातून पाणी सोडण्यास शंभूराज देसाईंची आडकाठी; ताकारी योजना बंद करण्याची वेळ, कृष्णेचं पात्रही पडणार कोरडं?

गेल्या गळीत हंगामातील प्रतिटन उसाचा ४०० रुपयांचा दुसरा हप्ता, तसेच यावर्षीच्या प्रतिटन उसाला ३५०० रुपये दर द्यावा, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दोन महिन्यांपासून आंदोलन सुरू केले होते. जिल्हामार्ग रोखल्यानंतरही तोडगा न निघाल्याने आज महामार्गावर चक्काजामचे हत्यार उपसले होते. सकाळी १० वाजून ३० मिनिटांनी शिरोली येथील पुलावर वाहतूक रोखण्यास सुरुवात झाली. सायंकाळपर्यंत ही वाहतूक ठप्पच होती. सायंकाळी ६ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्यासह शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक झाली.

या बैठकीतील निर्णय श्री. शेट्टी यांनी आंदोलनस्थळी जाहीर सायंकाळी सात वाजता चक्काजाम आंदोलन मागे घेतले. त्यानंतर सर्व वाहूतक सुरळीत होण्यासाठी सुमारे एक तासाहून अधिक वेळ लागला. तत्पूर्वी, श्री शेट्टी म्हणाले, साखर कारखान्यांनी जो तोडगा काढला आहे. त्याला सहमती असल्याचे पत्र जिल्हाअधिकाऱ्यांना दिले पाहिजे. जोपर्यंत कारखान्यांकडून पत्र दिले जात नाही. तोपर्यंत कारखाने सुरू करू दिले जाणार नाहीत.

दरम्यान, श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिल्यामुळे आंदोलनकर्त्यांच्या अंगात दहा हत्तीचे बळ आले असल्याचेही शेट्टी यांनी सांगितले. यावेळी, संघटनेचे राज्याध्यक्ष प्रा. जालंधर पाटील, जिल्हाअध्यक्ष वैभव कांबळे, सावकार मादनाईक आदी उपस्थित होते.

Pune Bangalore Highway Chakka Jam Andolan Raju Shetti
सरवण यांना आमदार बनवण्यासाठी माजी मुख्यमंत्र्यांनी पैसे घेतले; इब्राहिम यांचा कुमारस्वामींवर गंभीर आरोप

घटनाक्रम

  • - सकाळी १० वाजता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते शिरोली पुलावर दाखल

  • - त्याच दरम्यान माजी खासदार राजू शेट्टी श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी मंदिरात दाखल

  • - साडेदहा वाजता कार्यकर्त्यांनी महामार्गावर ठिय्या मारला.

  • - पोलिसांनी पुण्याकडे जाणारी वाहतूक बंद करून पर्यायी मार्गाने वळवली.

  • - अकरा वाजता दोन्ही बाजूची वाहतूक बंद केली.

  • - दुपारी बाराच्या सुमारास राजू शेट्टी आंदोलनस्थळी दाखल. जोपर्यंत सर्व कारखाने शंभर रुपये देणार असल्याचे लेखी जाहीर करत नाहीत तोपर्यंत जागा सोडणार नसल्याचा निर्धार

  • - दुपारी एकपर्यंत ५००० कार्यकर्ते आंदोलनस्थळी एकवटले

  • - दोन वाजता कार्यकर्त्यांसाठी जेवण बनवण्याला प्रारंभ

  • - सुमारे दोन तास तोडग्याची प्रतीक्षा. शासन आणि पालकमंत्र्यांविरुद्ध जोरदार घोषणाबाजी

  • - सायंकाळी साडेचारच्या सुमारास श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांचा आंदोलनस्थळी भेट देऊन पाठिंबा

  • - सायंकाळी पाचच्या सुमारास महामार्गावरच जेवणाच्या पंगती सुरू. याचदरम्यान जिल्हाधिकारी व संघटना पदाधिकाऱ्यांत चर्चा

  • - सायंकाळी ७ वाजता अंतिम तोडगा निघाल्याची राजू शेट्टी यांची घोषणा. त्यानंतर फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण

जिल्हाधिकारी, शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींचे पत्र

मागील हंगामातील उसाच्या दराबाबत कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व साखर कारखाने, आंदोलक संघटना आणि प्रशासन यांच्यामध्ये झालेल्या चर्चेमध्ये ठरविण्यात येत आहे की, मागील हंगामामध्ये शेतकऱ्यांना उसाचा दर प्रती टन रुपये ३ हजारांपेक्षा कमी ज्या साखर कारखान्यांनी दिलेला आहे, त्यांनी मागील हंगामातील शेतकऱ्यांना १०० रुपये अतिरिक्त प्रती टन द्यावे व ज्यांनी ३ हजार रुपयांपेक्षा जास्त दर दिलेला आहे, त्या कारखान्यांनी ५० रुपये प्रतिटन अतिरिक्त शेतकऱ्यांना द्यावेत.

यासाठीचा प्रस्ताव शासनाकडे त्वरित साखर कारखान्यांनी पाठवावा व पुढील दोन महिन्यांमध्ये त्यास मान्यता देण्याचे आश्‍वासन मुख्यमंत्र्यांनी कोल्हापूरचे पालकमंत्री यांना दिले आहे. तसेच, दोन महिन्यांनंतर वरीलप्रमाणे अतिरिक्त रक्कम शेतकऱ्यांना साखर कारखान्यांनी देण्याची आहे. तरी सर्व साखर कारखान्यांनी याप्रमाणे आपले संमतीपत्र जिल्हाधिकारी कार्यालयात आणून द्यावे, असे आवाहन सर्व साखर कारखान्यांना पालकमंत्र्यांनी यांनी केले आहे. या आश्‍वासनाप्रमाणे जिल्ह्यात चालू असणारे मागील हंगामासाठी वाढीव उसाचे दर मागणी विषयीचे आंदोलन व आजचे चक्काजाम आंदोलन स्थगित करण्यात येत असल्याचे पत्राद्वारे जाहीर करण्यात आले.

Pune Bangalore Highway Chakka Jam Andolan Raju Shetti
DK Shivakumar : बेहिशोबी मालमत्तेप्रकरणी उपमुख्यमंत्र्यांना मोठा दिलासा; राज्य सरकारने डीकेंविरोधातील CBI तपास केला रद्द

कारखादारांची एकजूट तुटली

गेल्या दोन महिन्यांपासून ‘स्वाभिमानी’ने मागील हप्त्यासाठी विविध मार्गाने आंदोलन केले; पण कारखानदारांनी कोणत्याही परिस्थितीत हे आंदोलन यशस्वी होऊ द्यायचे नाही, याचा विडा उचलला होता. प्रत्येक आंदोलनाकडे डोळेझाक केली. तसेच, शेतकऱ्यांमधील एकजूट तोडण्यासाठी अनेक प्रयत्न केले. मात्र या प्रयत्नाला शेतकऱ्यांनी भीक घातली नाही. शेतकऱ्यांच्या एकजुटीमुळे कारखानदारांची एकजूट तुटली असल्याचे, सांगताच कार्यकर्त्यांनी शेट्टी यांचा जयघोष केला.

आता मिशन सांगली

कोल्हापुरातील आंदोलन यशस्वी झाल्यानंतर श्री. शेट्टी यांनी आपला मोर्चा सांगली जिल्ह्यातील कारखान्यांकडे वळवला आहे. सांगलीतील कारखान्यांनी अद्यापही दर जाहीर केलेला नाही. त्यामुळे कोल्हापुरातील ऊस पुरवठा बंद केला जाणार आहे. तसेच दरासाठी जोरदार आंदोलन करण्याची घोषणा करत, सुरुवात राजारामबापू कारखान्यापासून करणार असल्याचे श्री. शेट्टी यांनी जाहीर केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.