Pune Congress: काँग्रेस भवनातील होमहवन नेत्यांना भोवणार? हायकमांड ऍक्शन मोडवर

पुण्यातील काँग्रेस भवनातील धक्कादायक प्रकार समोर
Pune Congress Bhawan
Pune Congress Bhawanesakal
Updated on

Pune Congress Bhawan: पुण्यातील काँग्रेस भवनातील धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एकीकडे राहुल गांधी भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून लोकांमध्ये मिसळत आहेत. तर दुसरीकडे पुण्यातीस काँग्रेस भवनात 11 डिसेंबर रोजी पक्षाची भरभराट व्हावी, यासाठी होमहवन करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. यावरून काँग्रेसवर सर्वच स्थरातून टीका केली जात आहे.

Pune Congress Bhawan
Pune Crime: काळ्या जादूची घटना; दोन तृतीयपंथीयांना अटक

तर या प्रकरणाची दखल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी घेतली आहे. या प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. तर या घटनेची चर्चा पक्षाच्या केंद्रीय पातळीवर झाली असल्याचे सांगितले जात आहे.

शुक्रवारी काँग्रेसची आगामी दिशा ठरविण्यासाठी दिल्लीत बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला सर्व राज्यांचे प्रभारी, प्रदेशाध्यक्ष आणि विधिमंडळ नेते उपस्थित होते. त्यावेळेस या घटनेची चर्चा झाली असल्याचे सांगितले जाते.

Pune Congress Bhawan
Winter Session: अजित पवारांचे पुणेरी चिमटे, मंत्री उदय सामंत यांना जवळ बोलावत म्हणाले…

या बैठकीत जेव्हा महाराष्ट्राचा विषय निघाला तेव्हा काँग्रेसच्या एका नेत्याने पुण्यातील काँग्रेस भवनमध्ये झालेल्या होम हवन बद्दल हाय कमांडच्या निदर्शनास आणून दिले. तर यावरून काँग्रेसला टीकेला सामोरे जावं लागत असल्याची चर्चा देखील या बैठकीत झाली.

पक्षाचे सरचिटणीस के. सी. वेणूगोपाल यांनी बैठकीतच महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना या होमहवन प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्याचा आदेश दिला. त्यावर पटोले यांनी, निरीक्षक नेमून अहवाल सादर करून योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले.

काँग्रेस भवनाच्या 82 वर्षाच्या इतिहासात अशा पद्धतीने कधी होम हवन करण्यात आले नव्हते मात्र शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या कार्यकाळात पहिल्यांदा अशा पद्धतीने होम हवन करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.