Pune Crime: कोयता गँगवर मोक्का लावा अन्...; अजित पवार अधिवेशनात कडाडले

"कोयता गँग' च्या नावाखाली या टोळ्यांनी दहशत माजविली आहे
Pune Crime
Pune Crimeesakal
Updated on

रात्री अपरात्री वाहने अडवून लूट करणे, महिलांच्या अंगावरील दागिने हिसकावणे, किरकोळ व्यापारी, भाजी विक्रेते, टपरीवाले आदींना कोयता दाखवून दहशत माजवीत, जखमी करीत लुबाडणूक करणे आदी प्रकार गेली काही महिन्यांपासून परिसरात वाढले आहेत.

Pune Crime
Gram Panchayat Result: कोणाचा गुलाल, कोणाची निराशा? जाणून घ्या ग्रामपंचायत निवडणुकीची सविस्तर निकाल

यामध्ये अल्पवयीन मुलांच्या टोळ्या सक्रीय असून "कोयता गँग' च्या नावाखाली या टोळ्यांनी दहशत माजविली आहे. या टोळ्यांकडून वारंवार होणाऱ्या अनुचित प्रकारामुळे मांजरीकर धास्तावले असून गावातील नागरिकांनी एकत्रीत हडपसर पोलीस ठाण्यात जाऊन दहशतीबाबत लक्ष घालण्याची मागणी पोलिसांकडे केली आहे.

मात्र या घटांमध्ये दिवसांदिवस वाढ होत चालली आहे. त्यावर आज अधिवेशनात विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी प्रश्न मांडला आणि त्याची माहिती त्यांनी ट्विट करत दिली आहे त्यांनी ट्विटमध्ये लिहिले आहे, "कोयता गँगचे वाढते लोण रोखण्यासाठी, राज्यात कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांकडून कठोर कारवाई करण्यात यावी.

हेही वाचा: असं एक गाव, जिथं जमिनीला कान लावला तरी संगीत ऐकू येतं...

त्यासाठी या गँगच्या गुन्हेगारांना मोक्का लावा, तडीपार करा. त्यांची दहशत कोणत्याही परिस्थितीत मोडून काढा. महिलांचे दागिने लुटणं, चोरी, गाड्यांची मोडतोड, जेवणाचे बिल न भरता हॉटेलमध्ये तोडफोड यांसारख्या हिंसक कारवायांमुळे पुण्यासह राज्यातल्या अनेक शहरातील नागरिक कोयता गँगच्या दहशतीखाली जगत आहेत.

पुणे परिसरातल्या मांजरी बुद्रुक, भेकराईनगर, गंगानगर, मुंढवा रस्ता, हडपसर भागात कोयता गँगच्या गुन्ह्यांचं प्रमाण वाढलं आहे. कोयता गँगमध्ये अल्पवयीन मुलांचा समावेश हा सुद्धा गंभीर मुद्दा आहे. हे तरुण रात्री-अपरात्री रस्त्यावर हवेत कोयते परजत फिरतात चोऱ्या करतात." असं ट्विटमध्ये लिहिले आहे.

त्यामुळे आता पुणे शहर आणि इतर भागात पोलिसांनी कंबर कसून कामाल सुरूवात केली आहे, त्यामुळे आता पुण्यात कायदा सुव्यवस्था कडक ठेवण्यात पुणे पोलिस किती प्रयत्न करतात हे पाहवं लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.