Pune Drugs Case : पुणे पोलिसांना हवा असलेला 'सॅम ब्राऊन' आहे तरी कोण? तीन महिन्यात दोन हजार किलो ड्रग्ज बनवण्याचं टार्गेट

पुणे पोलिसांनी तीने ते चार दिवसांत चार हजार कोटी रुपये किंमतीचं ड्रग्ज जप्त केलं आहे. पुणे पोलिसांच्या इतिहासातील ही सर्वात मोठी कारवाई समजली जातेय. या प्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केली असून मुख्य आरोपीचा पोलिस शोध घेत आहेत.
Pune Drugs Case
Pune Drugs Case esakal
Updated on

पुणेः पुणे पोलिसांनी तीने ते चार दिवसांत चार हजार कोटी रुपये किंमतीचं एमडी ड्रग्ज जप्त केलं आहे. पुणे पोलिसांच्या इतिहासातील ही सर्वात मोठी कारवाई समजली जातेय. या प्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केली असून मुख्य आरोपीचा पोलिस शोध घेत आहेत.

पुणे पोलिसांची तब्बल दहा पथके देशातील विविध शहरांमध्ये एनसीबीला सोबत घेऊन कारवाई करत आहेत. दिल्ली, बंगळूरु, हैदराबाद या प्रमुख शहरासह पुणे पोलिसांचे पथकं अनेक गोडाऊनमध्ये ड्रग्जचा शोध घेत आहेत. या प्रकरणी पोलिसांनी विकी माने, हैदर शेख, अनिल साबळे, अजय करोसिया आणि युवराज भुजबळ या पाच जणांना अटक केली. ड्रग्ज तयार करणाऱ्या इंजिनिअरला ताब्यात घेतल्याची माहिती सध्या समोर येत आहे.

पुण्यातील २००० किलो ड्रग्स रॅकेटचा मास्टरमाईंड कोण? असा प्रश्न उपस्थित होत असून 'सॅम ब्राऊन' या नावाने फिरणाऱ्या परदेशी नागरिकाचा पुणे पोलिस शोध घेत आहेत. या सॅम नावाच्या मास्टरमाईंडचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन असल्याचा संशय पोलिसांना आहे.

Pune Drugs Case
VIDEO: सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार पटकावल्यानंतर किंग खानचं मजेशीर भाषण; चाहत्यांना केलं 'खास' प्रॉमिस

दरम्यान, पुण्यातील ड्रग्ज प्रकरणात अटक केलेल्या आरोपींना ३ महिन्यात २००० किलो एमडी बनवण्याचे टार्गेट दिल्याची माहिती पोलिसांना मिळालेली आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेला युवराज भुजबळ याला पुणे पोलिसांनी डोंबिवलीमधून अटक केली आहे. सॅम नावाच्या गृहस्थानेच भुजबळ नावाच्या आरोपीला एमडी बनवण्याचा फॉर्म्युला दिल्याचं सांगितलं जातंय. त्यावरुन भीमाजी उर्फ अनिल साबळे आणि युवराज भुजबळ यांनी कुरकुंभ येथे सुरू ड्रग्जचा कारखाना सुरु केला होता.

Pune Drugs Case
Yugendra Pawar : शरद पवारांची दूरदृष्टी! अजित पवारांच्या पुतण्यावर चार वर्षांपूर्वी दिली होती 'ही' जबाबदारी; युगेंद्र पवार म्हणाले...

कुठे-कुठे सापडलं ड्रग्ज?

  • १८ फेब्रुवारी रोजी पुण्यातल्या सोमवार पेठेत केवळ २ किलो ड्रग्ज सापडलं होतं.

  • १९ फेब्रुवारीला विश्रांतवाडीत १०० कोटींपेक्षा जास्त किंमतीचं ड्रग्ज सापडलं.

  • यासह दौंडमध्ये ५५० किलो ड्रग्ज सापडलं आहे.

  • २० फेब्रुवारीला करकुंभ एमआयडीसीत ११०० कोटी रुपयांचं ड्रग्ज पुणे पोलिसांनी जप्त केलं.

  • याच दिवशी म्हणजे २० फेब्रुवारी रोजीच पुणे पोलिसांनी दिल्लीत ८०० किलो ड्रग्ज जप्त केलं.

  • बुधवारी २१ फेब्रुवारी रोजी पुन्हा पुणे पोलिसांनी दिल्लीतच १२०० कोटींचा ड्रग्ज साठा जप्त केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.