गिरीश बापट यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पुणे लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवाराच्या चाचपणीला सुरुवात झाली आहे. काही दिवसांपूर्वी भाजप नेते आणि पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचं निधन झालं. त्यांच्या निधनानं पुणे लोकसभा मतदारसंघ रिक्त झाला आहे. या जागेवर आता पोटनिवडणुकीसाठी हालचालींना वेग आला आहे.(Pune Lok Sabha Bypoll Election BJP discussion Name murlidhar mohol swarda bapat After Girish Bapat )
दरम्यान, रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून तीन नावांची चर्चा सुरू आहे. या तीन जणांपैकीच एकाला तिकीट मिळणार असल्याची माहिती समोर येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भाजपकडून पुणे लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी गिरीश बापट यांच्या सून स्वरदा बापट, पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ आणि माजी खासदार संजय काकडे यांच्या नावाची चर्चा आहे.
तर दुसरीकडे मविआकडून कसब्याचे नवनिर्वाचीत आमदार रविंद्र धंगेकर यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.
भाजपकडून पुणे लोकसभा पटोनिवडणुकीसाठी गिरीश बापट यांच्या सून स्वरदा बापट किंवा मुलगा गौरव बापट, पुण्याचे माजी महापैर मुरलीधर मोहळ, पुण्याचे माजी खासदार संजय काकडे, यांच्यासोबतच मेधा कुलकर्णी आणि शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांची नावं चर्चेत होती.
मात्र गिरीश बापट यांचं निधन झाल्यानंतर अवघ्या दोनच दिवसांमध्ये मुळीक यांचा भावी खासदार असा उल्लेख असलेले पोस्टर पुण्यात झळकले होते. त्याचा त्यांना फटका बसण्याची शक्यता आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.