Pune Crime: गुन्हेगारीचा पुणे पॅटर्न ! तुमचाही मुलगा कोयता गॅंगमध्ये नाही ना?

ल्या काही महिन्यांपासून शहराला 'कोयता गँग' चे ग्रहण लागले आहे
Pune Crime
Pune Crimeesakal
Updated on

पुणे: गेल्या काही महिन्यांपासून शहराला 'कोयता गँग' चे ग्रहण लागले आहे. मध्यवर्ती भाग असो किंवा उपनगर, टोळक्यांकडून अनेक वेळा कोयत्यासारखे धारदार शस्त्र घेऊन दहशत माजवण्याचे प्रकार शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळख असलेल्या पुण्यात सर्रास सुरू आहेत. पुण्यातील कुठल्या भागात गेल्या एक महिन्यात कोयत्याने हल्ले झाले आहेत ते पहा..

पुण्यातील कोणत्या कोणत्या भागात कोयता गॅंगची दहशद पसरवली

हडपसर: पुण्यातील हडपसर भागात कोयता घेऊन दहशत करण्याचा प्रकार वारंवार घडत असल्याने तिथल्या नागरिकांनी पोलिस ठाण्यावर मोर्चा नेला होता.

भर दिवसा भाजिवल्यांकडून किंवा इतर विक्रेत्यांकडून ही कोयता गँग धमकावून खंडणी मागायची.

विशेष म्हणजे हडपसर या भागातून या आधी देखील असेच गुन्हे घडल्याचे प्रकार वारंवार घडल्याचे स्थानिकांनी सांगितले आहे.

सिंहगड रोड: शहरातील सिंहगड लॉ कॉलेज जवळ संध्याकाळी गर्दीच्या वेळेला २ तरुणांनी हातात कोयता घेऊन हैदोस केला होता.

दिसेल त्याला रस्त्याने अडवत त्याला धमकी देऊन त्याच्यावर कोयता उगरत होते. या हल्ल्यात एक तरुण जखमी झाला होता.

यातील एका आरोपीला पोलिसांनी त्याच वेळी पाठलाग करून पकडलं होतं तर दुसऱ्या आरोपीच्या मुसक्या बीड मध्ये आवळून त्याची धिंड देखील काढण्यात आली होती. या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले.

Pune Crime
वडिलांच्या अमृत महोत्सवी दिनी संभाजी छत्रपती यांनी फेसबुकवर लिहिलं भावनिक पत्रं

कॅम्प: बाहेर बसून टवाळक्या करत असल्याने हॉटेल मालकाने काही तरुणांना सांगितले आणि याच गोष्टीचा त्या ५ जणांना इतका राग आला आला की त्यांनी थेट कोयते घेऊनच हॉटेल मध्ये शिरत नुकसान केले. इतक्यावर न थांबता या तरुणांनी हॉटेल मालकाला ही धमकावले होते.

नाना पेठ: पोलिसांनी वेळेत पुण्यातील नाना पेठेतील नवावडा या परिसरातील तरुणांना अटक केल्यामुळे अनर्थ ठरला असे म्हंटले तर वावग ठरणार नाही.

एका सी सी टिव्ही फुटेज चा आधार घेत पोलिसांनी कोयते घेऊन फिरणाऱ्या ५ जणांना पोलिसांनी अटक केली होती.

हाथ भर लांब कोयते घेऊन ५ जण किरकोळ वादातून हल्ला करण्याचा कट रचत होते मात्र त्या आधी पोलिसांनी त्यांना बेड्या ठोकल्या.

वारजे: वारजे माळवाडीत देखील काही जणांनी कोयते घेऊन ‘पप्पूभाईच्या नादाला लागाल तर, एकेकाला खल्लास करून टाकेन’ अशी जीवे मारण्याची धमकी देत परिसरात दहशत पसरवली होती. हा सगळा प्रकार नोव्हेंबर मध्ये घडला होता. यातील आरोपींना मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

Pune Crime
Mumbai: मुंबई कस्टम अधिकाऱ्यांनी 30 लाख रुपये किमतीच्या 4 लाख सिगारेट जप्त

खडकवासला: पुणे जिल्ह्यातील खडकवासला या भागात २ सराईत गुन्हेगारांनी लोखंडी रॉड आणि कोयत्याने ६ गाड्या फोडल्याची घटना. गाड्यांची तोडफोड केल्यानंतर हे दोघे ही जण लवासा येथे पळून गेले.

गाड्यांची तोडफोड करून या भागात वर्चस्व राहावं यासाठी त्यांनी ५ चारचाकी गाड्या आणि १ टेम्पोचे मोठे नुकसान केले होते. ज्या ठिकाणी हे कृत्य केले त्याच ठिकाणी या दोन्ही आरोपींची 'वरात' निघाली होती.

पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीचा विशेषता तरुणांकडून होणाऱ्या कोयता हल्ल्याचा प्रश्न हिवाळी अधिवेशनात राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी देखील मांडला होता.

यानंतर याबाबत पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना, "पुणे शहराचे पोलिस आयुक्त रितेश कुमार हे शहरात घडणार्‍या महत्वाच्या घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत" असे म्हंटले.

यानंतर पुण्याचे पोलीस आयुक्त यांनी वारजे भागात कोयता घेऊन दहशत पसरवणाऱ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाई देखील केली.

कोयता घेऊन दहशत पसरवणे या घटनांमध्ये तरुणांचा एक विशेष गट सामील झाल्याचे आढळून आला आहे. यातील अनेक जण 13 ते अठरा वर्ष वयोगटातील असल्याचे निदर्शनास येतं.

या वयोगटातील मुलांमध्ये "अपोझिशनल डिफाइन डिसऑर्डर" म्हणजे असा रोग ज्यात हिंसकपणा वाढणे, थोर मोठ्यांचे न ऐकणे असे लक्षणं जाणून येत आहेत यामुळे असे कृत्य त्यांच्याकडून घडत असे, अशी प्रतिक्रिया मानसोपचारतज्ञ डॉक्टर निकेत कासार यांनी दिली आहे.

दुसऱ्या बाजूला, सोशल मीडिया वर याच वयोगटातील तरुण मुलं अग्रेसर आहेत. यामुळे या अल्पवयीन मुलांची अनेक जणांशी ओळख होत असते.

गुन्हेगारी क्षेत्रात जे सक्रिय आहेत आहेत ते अशा मुलांचा बरोबर वपार करून घेतात याचे कारण म्हणजे या अल्पवयीन मुलांना हवं तसं वापरता येतं, काम साधता येतं आणि यांचे वय १८ पेक्षा कमी असल्याने यांना जामीन देखील लवकर मिळतो, असे मत वकील मिलिंद पवर यांनी व्यक्त केले आहे

आत्तापर्यंत झालेल्या घटनांमध्ये पोलिसांनी कारवाया केल्या मात्र प्रश्न एवढ्यावरच सुटला नाहीये. अनेक महिन्यांपासून शहरातील विविध भागात टोळक यांचे धाडस वाढले आहे. अ

गदी किरकोळ कारणावरून ही तरुण मंडळी हिंसक होऊन हल्ले चढवताना दिसत आहेत.

ज्या वयात या मुलांच्या हातात पुस्तकं हवेत त्याच वयात यांच्या हातात कोयते आणि कुऱ्हाड आहेत. वेळीच या मुलांवर नियंत्रण आहे तर या मुलांचं भविष्य अंधार कोठडीत जाईल यात शंका नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.