Darshana Pawar Murder Case: “दर्शना पवारच्या हत्येनंतर मित्र राहुल हांडोरे फरारच झाला नाही, तर…”, तपासातून धक्कादायक खुलासे आले समोर

दर्शना पवारच्या हत्येप्रकरणी पुणे पोलिसांनी सखोल तपास केला त्यामध्ये अनेक खुलासे समोर येत आहेत
Darshana Pawar Murder Case
Darshana Pawar Murder CaseEsakal
Updated on

दर्शना पवार हत्याप्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. आरोपी राहुल हंडोरेला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. मुंबई येथून हंडोरेला अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुणे ग्रामीण पोलिसांनी राहुल हंडोरेला अटक केली आहे. लग्नाला नकार मिळाल्याने राहुल हंडोरे याने दर्शना पवारची हत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. (Latest Marathi News)

चार दिवसांनी त्याला अटक करण्यात आली आहे. दर्शना पवारची हत्या केल्यानंतर पोलिसांना आपला ठावठिकाणा समजू नये म्हणून त्याने वेगवेगळ्या प्रकारे प्रयत्न केल्याचे समोर आले आहेत. पुणे ग्रामीण पोलीस दलातील एका अधिकाऱ्याने या प्रकरणाबाबत इंडियन एक्स्प्रेसला घटनाक्रम सांगितला आहे.(Latest Marathi News)

Darshana Pawar Murder Case
Darshana Pawar Case: दर्शना पवार हत्या प्रकरणात पोलिसांना संशय असणारा तिचा मित्र राहुल हांडोरे कोण आहे?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल हंडोरेने फक्त पळून जाण्याचा प्रयत्न केला नाही, तर त्याने पोलिसांची दिशाभूलही करण्याचा प्रयत्न केला आहे. १८ जूनला दर्शनाचा मृतदेह आढळुन आल्यानंतर राहुल हंडोरेने पुणे सोडलं आणि रेल्वेने प्रवास करायला सुरुवात केली. पहिल्यांदा तो आधी सांगलीला गेला. तिकडून गोव्याला गेला. आरोपी राहुल गोव्यातच थांबला नाही, तर पुढे चंदीगड आणि तेथून पश्चिम बंगालमधील हावडा याठिकाणी फिरत राहिला.(Latest Marathi News)

यावेळी प्रवासात राहुल हांडोरे याने पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी मोबाईल बंद ठेवला. तो हावड्यावरून मुंबईला आला. या संपूर्ण रेल्वे प्रवासात त्याचा मोबाईल बंद होता. तो फिरत असताना स्थानिक किंवा प्रवासी यांच्या फोनवरून घरी आणि मित्रांना फोन करत होता. पोलिसांना त्याच्या कुटुंबाकडून या आलेल्या फोनची माहिती मिळाल्यानंतर त्या नंबरवरची माहिती मिळाल्यानंतर या नंबरवर पुन्हा कॉल करण्यात आले. त्यानंतर या प्रवाशांनी रेल्वेने प्रवास करणाऱ्या आणि कुटुंबाला कॉल करण्यासाठी फोन मागणाऱ्या राहुल हंडोरेची माहिती दिली.(Latest Marathi News)

Darshana Pawar Murder Case
Darshana Murder Case: 'प्रत्येकाच्या लाईफची एक स्टोरी असते...', संशयास्पद मृत्यू झालेल्या दर्शना पवारचं 'ते' शेवटंच भाषण

तर राहुल हांडोरे हा कुटुंबाला कॉल करून लगेच ठिकाण बदलत असे. इतरांच्या फोनवरून कॉल करून लगेच ठिकाण बदलायचा, अशीही माहिती पोलिसांनी दिली. अखेर आरोपी राहुल हंडोरे मुंबईतील अंधेरी रेल्वे स्टेशनवर येणार असल्याची माहिती पोलिसांना समजताच त्याला अटक करण्यात यश आलं. तो अंधेरीहून पुण्याला येणार होता.(Latest Marathi News)

राजगडाच्या पायथ्याशी काही दिवसांपूर्वी दर्शनाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडला होता. त्यानंतर पोलिसांनी दर्शना पवारची ओळख पटवून तपासाला सुरुवात केली. तेव्हा दर्शनासोबत राजगडावर गेलेला तिचा मित्र राहुल हंडोरे गायब झाल्याचे लक्षात येताच पोलीसांनी राहुल हंडोरेचा शोध सुरू केला होता.(Latest Marathi News)

Darshana Pawar Murder Case
Darshana Pawar Murder Case: 'माझ्या मुलीचे जसे तुकडे केले तसे त्याचे करू द्या', दर्शना पवारच्या आईने फोडला टाहो

अटक केल्यानंतर राहुल हंडोरे याने दर्शना पवारची हत्या केल्याची कबुली दिली आहे. यासंदर्भात पोलीसांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. राहुल हंडोरे आणि दर्शन पवार हे दोघेही पुण्यात एमपीएससीचे शिक्षण घेत असताना भेटले होते. हे दोघे एकमेकांचे नातेवाईकही होते. राहुलची दर्शनाशी विवाह करण्याची इच्छा होती. एमपीसी उत्तीर्ण झाल्यानंतर घरच्यांनी दर्शनाचा दुसऱ्या एका मुलासोबत विवाह ठरवला होता. त्यानंतर 'मला वेळ द्या 'अशी विनंती राहुलने तिच्या घरच्यांना केली होती. पण घरच्यांनी नकार दिला होता.(Latest Marathi News)

Darshana Pawar Murder Case
Darshana Pawar Murder Case: राहुल हंडोरेला पकडण्यासाठी पोलिसांनी लढवली शक्कल, असा आला जाळ्यात

दर्शना पवार तिचा मित्र राहुल हांडोरे याच्यासह १२ जून रोजी राजगड किल्ल्याच्या परिसरात फिरण्यासाठी गेली होती. दोघेही दुचाकीवरुन तिथं दाखल झाले होते. सकाळीच्या १० च्या सुमारास राहुल हांडोरे किल्ल्यावरुन एकटाच खाली येत असल्याचं एका हॉटेलच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आलं. तेव्हापासून राहुल हांडोरे गायब होता.(Latest Marathi News)

Darshana Pawar Murder Case
Darshana Pawar Murder Case: राहुल हंडोरेला पकडण्यासाठी पोलिसांनी लढवली शक्कल, असा आला जाळ्यात

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.