सदावर्तेंची रवानगी पुन्हा आर्थररोड तरुंगात, मुंबईतून कारवाई होणार

पुढील कारवाई मुंबईतून होईल, कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाने केलं स्पष्ट
Gunratn Sadavarte
Gunratn SadavarteSakal
Updated on
Summary

पुढील कारवाई मुंबईतून होईल, कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाने केलं स्पष्ट

एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत आहेत. आता अॅड. सदावर्ते यांना ताब्यात घेण्यासाठी पुण्यातून एक पोलिस पथक कोल्हापुरात दाखल झाले आहे. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी झालेल्या हिंसक आंदोलन प्रकरणात वकील गुणरत्न सदावर्ते यांना जामीन मंजूर झाला असला तरी इतर गुन्ह्यांनामधून त्यांची सुटका झालेली नाही. दरम्यान, गुणरत्न सदावर्ते यांची रवानगी पुन्हा एकदा आर्थर रोड जेलमध्ये करण्यात आली आहे. पुणे पोलिसांनी ताब्यात घेण्याचा अर्ज सादर केला होता त्यांच्याकडे हा ताबा देण्यात आलेला नाही. पुढील कारवाई मुंबईतून होईल असे कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाने स्पष्ट केलं आहे.

Gunratn Sadavarte
बाळा नांदगावकरांसह मनसेचे 2 दिग्गज नेते सह्याद्रीकडे रवाना, घडामोडींना वेग

सातारा, कोल्हापूर, अकोल्या पाठोपाठ आत पुण्यातही त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. पुण्यातील भरती विद्यापीठ पोलिस ठाण्यात सदावर्ते यांच्यावर गुन्हा दाखल असल्याने पुणे पोलिस आता सदावर्ते यांचा ताबा घेण्यासाठी कोल्हापुरात दाखल झाले आहेत. पुणे पोलिसांकडून सदावर्ते यांना ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. एका टिव्ही चॅनलवर मराठा समाज विरोधात आक्षेपार्ह भाष्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असल्याची माहिती मिळत आहे. याप्रकरणी सदावर्ते यांनी मराठा आरक्षणाला सातत्याने विरोध करून मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

दरम्यान, सदावर्ते यांना बुधवारी मुंबई येथील कारागृहातून शाहूपुरी पोलिसांनी ताब्यात घेतले होते. मुख्य न्यायदंडाधिकारी व्ही. पी. गायकवाड यांनी त्यांना २५ तारखेपर्यंत पोलिस कोठडीचा आदेश दिला होता. सकल मराठा क्रांती मोर्चाचे दिलीप पाटील यांनी सदावर्तेंविरुद्ध फिर्याद दाखल केली होती. त्या अनुषंगाने पोलिसांनी सदावर्ते यांना अटक केली होती. मराठा समाजाच्या आरक्षणाविरोधात सातत्याने चिथावणीखोर वक्तव्ये केल्याप्रकरणी सकल मराठा मोर्चाचे समन्वयक दिलीप पाटील यांनी अ‍ॅड. सदावर्ते यांच्याविरोधात शाहूपुरी पोलिसांत फिर्याद दिली होती. ॲड. सदावर्ते यांच्या विरुद्ध शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.

Gunratn Sadavarte
राणा दाम्पत्याची हायकोर्टात धाव; आज होणार सुनावणी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.