Pune Accident Latest News : पुण्यातील कल्याणीनगर येथे झालेल्या भीषण अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणाची सध्या देशभरात चर्चा सुरू आहे. या प्रकरणातील आरोपीचा जामीन बुधवारी (२२ मे) रद्द करण्यात आला असून आरोपीची ५ जूनपर्यंत बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे.
पण यापूर्वी आरोपी अल्पवयीन असल्याच्या कारण देत त्याला ३०० शब्दांचा निबंध लिहून जामीन देण्यात आला होता. यानंतर सर्व स्तरातून संताप व्यक्त केला जात होता. दरम्यान या अल्पवयीन आरोपीचा एक कथित व्हिडीओ समोर आला असल्याचा दावा केला जात होता. या व्हिडीओमध्ये एक मुलगा शिवीगाळ करताना पाहायला मिळत आहे.
तसेच जामीन मिळाल्यानंतर आरोपी मुलाने रॅप साँग तयार केले असल्याचे सांगितले जात होते. या व्हिडीओमधील मुलाने अत्यंत आक्षेपार्ह भाषा वापरली असून रॅप साँग गाताना तो लोकांना शिवीगाळ करताना पाहायला मिळत आहे. तसेच पुन्हा रस्त्यावर येण्याची भाषा देखील तो वापरत असल्याचे पाहायला मिळत आहे.
दरम्यान हा व्हिडीओ खरा आहे की डीप फेक याबद्दल पुष्टी होऊ शकलेली नाहीये. पोलिसांनी मात्र हा व्हिडीओ फेक असल्याचे म्हटले आहे.
दरम्यान आरोपीचे वकील आणि नातेवाईकांनी हा व्हायरल व्हिडीओ खोटा असल्याचे म्हटले आहे. तसेच आरोपीच्या नातेवाईकांनी यावेळी पत्रकारांना दमदाटी केल्याचे देखील पाहायला मिळाले.
व्हिडिओमध्ये बिल्डरचा मुलगा असल्याने जामीन मिळाल्याचे सांगत तो शिवीगाळ करत आहेत. तसेच रॅप साँग गाणारा हा मुलगा अपघाताबद्दल दोष देणाऱ्या लोकांना शिवीगाळ करताना दिसत आहे. हा व्हिडीओ डीप फेक असण्याची शक्यता असून नेमकं हा व्हिडीओ कधी आणि कोणी तयार केला याच्या चौकशीची मागणी केली जात आहे.
मिली बेल, फिर से दिखाऊंगा सडक पे खेल,
चार यार मेरे साथ, सिधे फाड देते ****
करके बैठा मै नशे...
इन माय पोर्शे
सामने आया कपल मेरे
अब वो है निचे
साऊंड सो क्लिंचे
सॉरी गाडी चढ आप पे
१७ साल की उमर
पैसे मेरे बाप पे
१ दिन में मिल गयी मुझे बेल
फीर से दिखा दुंगा सडक पे खेल
प्लेइंगद केरोसिन फोन्क इन माय नेक्स्ट स्पोर्ट्स कार
दरम्यान हा व्हिडिओ आर्यन नावाच्या एका Instagram क्रिएटरचा असल्याचा दावा केला जात आहे. तो अनेक विषयावर क्रिंज व्हिडिओ करण्यासाठी ओळखला जातो. मात्र त्याच्या प्रोफाईल वरून सदर व्हिडिओ हटवण्यात आला असून अधिक माहिती मिळू शकत नाही आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.