'PM मोदींच्या सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटीला पंजाब कॉंग्रेसचे सरकार जबाबदार'

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षा व्यवस्थेच्या प्रश्नावरून कॉंग्रेस पक्ष निर्लज्जपणाने खालच्या पातळीवर जाऊन टीका करीत आहे.
Bhagwant Khuba
Bhagwant Khuba esakal
Updated on

उमरगा (जि.उस्मानाबाद) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंजाब राज्यातील दौऱ्या दरम्यान झालेल्या सुरक्षेच्या त्रुटीबाबत पंजाबच्या काँग्रेस सरकारची यंत्रणा दोषी असल्याची टीका केंद्रीय नवीकरणक्षम ऊर्जा आणि रसायने व खते राज्यमंत्री भगवंत खुबा (Bhagwant Khuba) यांनी केली. उमरगा (Umarga) येथे शुक्रवारी (ता. सात) झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात मंत्री खुबा यांनी पत्रकाराशी संवाद साधला. रासायनिक खतांच्या किंमती शेतकऱ्यांना डोईजड होत असल्याच्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले कि, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खतासाठी लागणाऱ्या रॉ-मटेरियलच्या किंमती वाढल्याने युरिया व डीएपी खताच्या किंमतीत थोडी वाढ झाली होती. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी खताच्या किंमती स्थिर केल्या. शेतकऱ्यांनीही आता पारंपरिक शेती पद्धतीत बदल करून व्यापारी दृष्टीकोन ठेऊन कमी खर्चात अधिक उत्पन्न घेण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी केंद्र सरकारचे धोरण महत्त्वाचे ठरत आहे.(Punjab Congress Government Responsible For PM Modi Security Breach, Said Minister Bhagwant Khuba In Umarga)

Bhagwant Khuba
केंद्रीय मंत्र्यांचा असाही साधेपणा; भररस्त्यात गाडी थांबवून दानवेंनी साधला गावकऱ्यांशी 'संवाद'

कॉंग्रेसचा निर्लज्जपणा !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षा व्यवस्थेच्या प्रश्नावरून कॉंग्रेस पक्ष (Congress Party) निर्लज्जपणाने खालच्या पातळीवर जाऊन टीका करीत आहे. संपूर्ण देशातील १३५ कोटी नागरिकांना या गंभीर प्रकरणात काँग्रेस पक्षाच्या सरकारचा दुर्लक्षपणा झाल्याचे दिसून येत असताना चोरांच्या उलट्या बोंबा .. या प्रमाणे पातळी सोडून टीका केली जातेय. माजी केंद्रीय मंत्री मल्लिकार्जुन खरगे यांची बोचरी टीकाही दिशाहीन आहे, असे खुबा म्हणाले.

Bhagwant Khuba
PM मोदींच्या सुरक्षेवरुन अनुपम खेर म्हणाले - देव तारी, त्याला कोण मारी!

लातूर - गुलबर्गा रेल्वे मार्गासंदर्भात निवेदन

लातुर-गुलबर्गा रेल्वे मार्गासाठी मी स्वतः व प्रा. रविंद्र गायकवाड यांनी मागच्या टर्ममध्ये सर्वेसाठी निधी मंजूर केला (Osmanabad) होता. त्याचा सर्वेही झाल्याचे श्री. खुबा यांनी सांगितले. लातुर - गुलबर्गा व सोलापुर - हैदराबाद रेल्वेमार्गासाठी निधी व मंजुरी मिळण्याच्या मागणीचे निवेदन श्री. खुबा यांना देण्यात आले. उमरगा शहर कर्नाटक राज्य आणि महाराष्ट्र सीमा यांच्या मध्यभागी असुन उमरगा येथे एम.आय.डी.सी एरिया आहे. लातुर-गुलबर्गा या रेल्वेमार्गाचा सर्वे पूर्ण झालेला असुन त्याला निधी आणि मंजुरी तात्काळ मिळाला. तसेच सोलापुर ते हैदराबााद हा रेल्वेमार्ग मंजुर करुन त्याचा सर्वे तात्काळ करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली. मुळजचे विष्णू तानाजी बिराजदार, दिलीप जोशी, मोहन जाधव, अर्जुन बिराजदार, मुकुंद पाटील, दत्तात्रेय वाडीकर , तानाजी बिराजदार, बालाजी बिराजदार, शौकत शेख, योगेश मुगळे, वसीम वाडीकर, चंद्रकांत मजगे, मनिष सोनी, नितीन खमितकर आदींनी श्री. खुबा यांची भेट घेऊन निवेदन दिले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()