MNS Raj Thackeray : मनसेमध्ये चक्क पंजाबी तालुक्याध्यक्ष! राज ठाकरेंनी भाषणात उल्लेख केलेले सरदार कोण?

मराठी माणसांच्या न्याय हक्कासाठी लढणारी महाराष्ट्र नवनिर्माण सेना
MNS Raj Thackeray
MNS Raj ThackeraySakal
Updated on

Panvel News : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पनवेल येथे निर्धार सभा घेतली. या सभेतून त्यांनी मनसे येणाऱ्या काळात आंदोलन करणार असल्याचं सांगितलं असून समृद्धी महामार्ग, मुंबई - गोवा महामार्ग आणि विकासाच्या मुद्द्यावर सरकारला धारेवर धरले. त्याचबरोबर मनसेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये अनेक अमराठी लोकं असल्याचं सांगत त्यांनी कोकणातील मंडणगडच्या तालुकाध्यक्षांचं नाव घेतलं.

MNS Raj Thackeray
Himachal Rain : हिमाचलमध्ये पावसाचा प्रलय! भूस्खलनात घरे जमीनदोस्त, 60 जणांचा मृत्यू, शिव मंदिरातही आढळले मृतदेह

काय म्हणाले राज ठाकरे?

मराठी माणसांच्या न्याय हक्कासाठी लढणारा पक्ष म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ओळख आहे. त्याचबरोबर अमराठी असलेल्या पण मराठी बोलणाऱ्या नागरिकांनासुद्धा आपण एकत्र घेऊन काम केलं पाहिजे असं त्यांनी यावेळी सांगितलं. "सर्वांनी एकत्र येऊन महाराष्ट्राचा आणि मराठी जनतेचा विचार केला पाहिजे. महाराष्ट्रामध्ये गेल्या कित्येक पिढ्या राहणारे अमराठी लोकं आहेत. त्यामध्ये मारवाडी आहेत, गुजराती आहेत, तमिळी आहेत, पंजाबी आहेत. आपल्या पक्षातसुद्धा आहेत."

"कोकणातील मंडणगडचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा तालुकाध्यक्ष सरदार आहे. त्याच्या बोलताना लक्षात पण येणार नाही की तो सरदार आहे. तो पूर्ण मराठी आहे, त्याचे घरही मराठी आहे" असा उल्लेख राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात केला.

कोण आहे मंडणगडचा मनसे तालुकाध्यक्ष सरदार?

मंडणगडचे मनसे तालुकाध्यक्ष नवज्योतसिंग गौड हे आहेत. ते मूळ पंजाबी आहेत पण गेल्या अनेक वर्षांपासून त्यांचे वडील महाराष्ट्रातील रहिवाशी आहेत. त्यामुळे त्यांच्या घरातील सर्वांना मराठी भाषा येते. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मागच्या महिन्यात मंडणगड येथे सभा घेतली होती. त्यावेळी त्यांनी पुढचा आमदार हा मंडणगडचा मनसेचाच असेल अशी घोषणा केली होती. त्यावेळी गौड यांचा खास गौरवही राज ठाकरे यांच्याकडून करण्यात आला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.