सावकारांचे खरेदीखत रद्द! शेतकऱ्यांना परत मिळाली 1300 एकर जमीन

महाराष्ट्र सावकारी अधिनियम २०१४ अंतर्गत आठ वर्षांत ८२२ शेतकऱ्यांना जवळपास तेराशे एकर जमीन खासगी सावकारांकडून जिल्हा उपनिबंधकांच्या माध्यमातून परत मिळाली आहे.
शेतकऱ्यांना मदत
शेतकऱ्यांना मदतESAKAL
Updated on

सोलापूर : महाराष्ट्र सावकारी अधिनियम २०१४ अंतर्गत मागील दोन वर्षात हतबल बळीराजाकडून बळकावलेल्या खासगी सावकारांकडील १६.९ एकर जमीन जिल्हा उपनिबंधकांनी (डीडीआर) सात शेतकऱ्यांना परत मिळवून दिली आहे. आणखी तीन शेतकऱ्यांना जमीन मिळणार आहे. आठ वर्षांत ८२२ शेतकऱ्यांना जवळपास तेराशे एकर जमीन खासगी सावकारांकडून जिल्हा उपनिबंधकांच्या माध्यमातून परत मिळाली आहे.

शेतकऱ्यांना मदत
आघाडी सरकार जून महिन्यात कोसळण्याचे नारायण राणेंचे भाकीत

बॅंका मागेल तेवढे कर्ज देत नाहीत, भरमसाठ कागदोपत्र गोळा करूनही कर्ज मिळायला विलंब लागतो. अशा परिस्थितीत शेतकरी आवश्यक तेवढी रक्कम गरजेला मिळावी म्हणून खासगी सावकाराचा दरवाजा ठोठावतो. शेतकऱ्याची गरज ओळखून काही खासगी सावकार कायद्याला बगल देऊन ज्यादा व्याजदराने कर्ज देतात. मुद्दलापेक्षा व्याजच डोईजड झाल्यानंतर तो सावकार पैशासाठी तगादा लावतो. त्याच्या त्रासातून सुटका व्हावी म्हणून शेतकरी त्याच्या जगण्याचा आधार असलेली जमीन सावकाराच्या नावे करतो. काही महिन्यांनी किंवा वर्षांनी पैसे घेऊन गेल्यानंतर तो सावकार जमीन परत करीत नाही. त्यावर शेतकरी पोलिस ठाण्यात किंवा थेट जिल्हा उपनिबंधकांकडे तक्रार करतो. त्यानंतर शेतकरी व खासगी सावकार, यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांची पडताळणी जिल्हा उपनिबंधकांकडे होते. त्यावर समोरील खासगी सावकाराने अवैधरित्या शेतकऱ्याची जमीन बळावल्याचे सिध्द झाल्यानंतर त्याच्या नावावरील किंवा त्याने कोणाला जमीन विकली असल्यास त्यांचे खरेदीखत रद्द करून सबंधित शेतकऱ्याला जमीन परत दिली जाते. हा कायदा अंमलात आल्यापासून २०१४ पासून राज्यातील ८२९ शेतकऱ्यांनी संघर्ष करून खासगी सावकारांच्या पाशातील शेतजमीन परत मिळविली. सोलापूर जिल्ह्यातील ५६.८४ हेक्टर शेतजमीन परत मिळाली आहे.

शेतकऱ्यांना मदत
टोपेंच्या आरोपाला अब्दुल सत्तारांचे उत्तर; म्हणाले...

साक्ष-पुराव्याच्या आधारावर समोरील व्यक्ती अवैध खासगी सावकार असून त्याने जमीन बळकावल्याचे सिध्द झाल्यास थेट संबंधित शेतकऱ्याला जमीन परत करण्याचा अधिकार जिल्हा उपनिबंधकांना मिळाला आहे. मागील दोन वर्षांत नऊ शेतकऱ्यांना खासगी सावकारांकडील त्यांच्या जमिनी परत मिळाल्या आहेत.
- कुंदन भोळे, जिल्हा उपनिबंधक, सोलापूर

शेतकऱ्यांना मदत
महागाईविरोधात राष्ट्रवादीने लावले "श्री राम, जय राम" चे होर्डींग्ज

बळीराजासाठी जिल्हा उपनिबंधक देवमाणूस
जिल्हा उपनिबंधक म्हणून पदभार घेतल्यानंतर कुंदन भोळे यांनी जिल्ह्यातील अवैध सावकारीवर लक्ष केंद्रित करून बळीराजाला न्याय देण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या दोन वर्षाच्या कार्यकाळात नऊ जणांना जमिनी परत मिळाल्या. त्यात महेश संभाजी भोसले (रा. बार्डी, ता. पंढरपूर), रामचंद्र तुकाराम माने (रा. आष्टी, ता. मोहोळ), आबा जयराम शिंदे, रूपाली किसन शिंदे (रा. अनवली, ता. पंढरपूर), हणमंत रंगनाथ वसेकर (रा. पाटकूल, ता. मोहोळ), मारूती गणपत कदम (रा. विरवडे खुर्द, ता. मोहोळ) व उत्तर सोलापूर तालुक्यातील डोणगावमधील धैर्यशिल हरी पाटील व अन्य तिघांचा समावेश आहे. सावकाराकडील जमीन परत मिळाल्याबद्दल त्यांनी जिल्हा उपनिबंधकांचा ‘देवमाणूस’ असा उल्लेख करून आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.