Pusesawali Riots : साताऱ्याच्या पुसेसावळीत मोठी दंगल; एकाचा मृत्यू, हल्ल्यात 10 जखमी, 200 जणांवर गुन्हा, काय आहे प्रकरण?

गृह विभागाने खबरदारी म्‍हणून जिल्ह्यातील इंटरनेट सेवा बंद करण्‍याच्‍या सूचना संबंधित कंपन्‍यांना केल्‍या.
Pusesawali Riots
Pusesawali Riotsesakal
Updated on
Summary

पुसेसावळी येथे दंगल उसळल्‍यानंतर खासदार उदयनराजे भोसले यांनी रात्री दोनच्या सुमारास साताऱ्यातील शाही मस्‍जिदला भेट देत मुस्‍लिम बांधवांशी चर्चा केली.

पुसेसावळी/ राजाचे कुर्ले : सोशल मीडियावर महापुरुषांबद्दलच्‍या (Pusesawali Viral Post) वादग्रस्त पोस्टमुळे येथे काल रात्री उशिरा दंगल (Pusesawali Riots) भडकली. संतप्त जमावाने येथील प्रार्थनास्थळावर हल्ला करत आतील ११ जणांना मारहाण केली. जमावाने केलेल्‍या मारहाणीत एकाचा मृत्यू झाला.

नूरहसन शिकलगार (वय २७, पुसेसावळी) असे मृताचे असून, हल्‍ल्‍यातील १० जखमींवर कऱ्हाडच्या कृष्णा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमी सरफराज बागवान यांच्‍या फिर्यादीवरून औंध पोलिसात (Aundh Police) तब्बल २०० जणांवर गुन्हा नोंदविण्‍यात आला आहे.

Pusesawali Riots
Satara News: महापुरुषांचा सोशल मीडियावर अवमान, साताऱ्यातील पुसेसावळी येथे दंगल; हिंसक जमावाने घरे पेटवली

काल रात्रीच्‍या दंगलीत सहा दुचाकी, एक चारचाकी जमावाकडून जाळण्याबरोबरच अनेक घरांची, दुकानांची तोडफोड करण्‍यात आली आहे. दंगलीत मृत झालेल्‍या नूरहसन यांचा मृतदेह सोमवारी दुपारी नातेवाइकांनी पोलिस बंदोबस्‍तात जिल्‍हा शासकीय रुग्‍णालयातून ताब्‍यात घेतला. यावेळी त्‍याठिकाणी मोठा जमाव जमला होता. याप्रकरणी अटकेतील २३ जणांना पाच दिवस पोलिस कोठडीत ठेवण्‍याचे आदेश न्‍यायालयाने दिले आहेत.

विशेष पोलिस महानिरीक्षक मनोज फुलारी, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी सायंकाळी पत्रकारांना माहिती दिली. याप्रकरणी जमावातील २३ जणांना अटक केल्‍याचे पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी सांगितले. जिल्ह्यातील इंटरनेट सेवा काल मध्‍यरात्रीपासून बंद ठेवण्‍यात आली असून, पुसेसावळीसह परिसरात जमावबंदी आदेश लागू केला आहे.

Pusesawali Riots
Neelam Gorhe : सत्तेत होता, तेव्हा आरक्षण का दिलं नाही? आता फडणवीसांना खलनायक ठरवलं जातंय; नीलम गोऱ्हेंचा ठाकरेंवर निशाणा

अनुचित घटना घडू नये, यासाठी पुसेसावळीसह परिसरात राज्य राखीव पोलिस दलासह जिल्ह्यातील पोलिस बंदोबस्त ठेवण्‍यात आल्‍याने गावाला पोलिस छावणीचे स्वरूप आले आहे. पुसेसावळीसह जिल्ह्यात दिवसभरात तणावपूर्ण शांतता होती. साताऱ्यातील जिल्हा रुग्णालयात ठेवण्यात आलेला शिकलगार यांचा मृतदेह पोलिस बंदोबस्‍तात सायंकाळी चारच्या सुमारास पुसेसावळीत आणण्यात आला.

यानंतर दंगलीत सहभागी असणाऱ्या सर्व संशयितांना अटक होईपर्यंत दफनविधी न करण्‍याचा पवित्रा त्‍याठिकाणी जमलेल्‍यांनी घेतला. यामुळे मोठा तणाव निर्माण झाला होता. घडल्‍या प्रकाराची माहिती देण्‍यासाठी घेतलेल्‍या पत्रकार परिषदेत पोलिसांनी अत्‍यंत त्रोटक माहिती देत अटकेतील संशयितांची तसेच जखमींची नावे सांगणे टाळले.

दंगलीत जखमी झालेल्‍या सरफराज बागवान यांच्‍या फिर्यादीनुसार, जमावावर खून, खुनी हल्ला, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान अशा स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्‍यात आले आहेत. जमावाने केलेल्‍या हल्ल्यात अब्दुलकादीर जिलानी मुल्ला, वसीम बालम मुल्ला (दोघे रा. वाघेरी, ता. कऱ्हाड), सरफराज इलाही बागवान, समीर इलाही बागवान, अमन असीम बागवान, सोहेल नजीर बागवान, इस्‍माईल बशीर बागवान, सैफ हरुण बागवान, अस्लम बाबासाहेब शेख, अखील नजीर, इनामदार (सर्व रा. पुसेसावळी) हे जखमी झाले असून, त्‍यांच्‍यावर कऱ्हाडच्या कृष्णा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Pusesawali Riots
ठाकरेंनी माझ्याकडं उमेदवारीसाठी दहा कोटींची मागणी केली आणि आदेश बांदेकरांना..; शिंदे गटाच्या आमदाराचा मोठा गौप्यस्फोट

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, सोशल माध्यमावर महापुरुषांविषयी वादग्रस्त पोस्ट प्रसारित झाली होती. त्याबाबत पोलिसात तीन दिवसांपूर्वी तक्रार देण्यात आली होती. त्याची पोलिस चौकशी सुरू असतानाच काल रात्री अचानक पुसेसावळी येथील दत्त चौकात युवकांचा जमाव जमला. जमावाने जवळपास अर्धा तास ‘जय श्रीराम’ अशा घोषणाही दिल्या. यानंतर रात्री साडेनऊच्या सुमारास जमाव गावात शिरला.

तेथून त्यांनी थेट मारुती मंदिरापासून जवळच असलेल्या प्रार्थनास्थळावर चाल केली. घोषणाबाजी करत जमावाने प्रार्थनास्‍थळात प्रवेश केला. जमावाने प्रार्थनास्‍थळात असणाऱ्यांना मारहाण करण्‍यास सुरुवात केली. याचवेळी काहीजणांनी त्‍याठिकाणची तोडफोडही केली. जवळपास अर्धा तास प्रार्थनास्‍थळात तोडफोड, मारहाण सुरू होती. दांडके, दगड, लोखंडी गजासारख्या शस्रांनी जमावाने आतमध्‍ये प्रार्थनेसाठी जमलेल्‍या ११ जणांना मारहाण केली.

Pusesawali Riots
Pusesawali Riotsesakal

मारहाणीत गंभीर जखमी झालेल्‍यांना त्‍याचठिकाणी सोडून नंतर जमाव निघून गेला. जमावाच्‍या मारहाणीत नूरहसन शिकलगारसहीत ११ जण गंभीर जखमी झाले. जमावाने केलेल्‍या मारहाणीत शिकलगार यांच्या डोक्यास गंभीर दुखापत झाल्‍याने त्‍यांचा जागीच मृत्यू झाला होता. याचदरम्‍यान जमावातील काहीजणांनी बाहेरील सहा दुचाकी पेटवल्‍या. दुचाकी पेटवल्‍यानंतर जमावाने गावातील अल्पसंख्याक समाजाची (Minority Community) घरे, दहा दुकाने, वाहनांची तोडफोड सुरू केली.

यामुळे पुसेसावळीत मोठा तणाव निर्माण झाला होता. जमावाच्‍या तोडफोडीत, जाळपोळीत लाखोंचे नुकसान झाले आहे. जमावाने गावातील मंडईत घुसून त्‍याठिकाणच्‍या साहित्‍याचेही मोठे नुकसान केले असून, याची माहिती मिळाल्‍यानंतर पोलिस त्‍याठिकाणी दाखल होऊ लागले. मात्र, तोपर्यंत हल्‍लेखोर पसार झाले होते. या घटनेची माहिती स्‍थानिक पोलिसांनी वरिष्‍ठांना दिल्‍यानंतर जिल्‍हाभरातील फौजफाटा त्‍याठिकाणी रवाना करण्‍यात आला.

Pusesawali Riots
Loksabha Election : 'भाजप-धजद युतीची अद्याप वेळ आली नाही'; कुमारस्वामींच्या वक्तव्याने खळबळ, BJP बॅकफूटवर?

पोलिसांनी पुसेसावळी येथील प्रार्थनास्‍थळात असणाऱ्या जखमींना नंतर उपचारासाठी इतरत्र हलवले. पोलिस अधीक्षक शेख, पोलिस उपअधीक्षक अश्विनी शेडगे यांच्यासह औंध व पुसेसावळीचे पोलिस तेथे पोचले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी सांगली, कोल्‍हापूर येथून वाढीव पोलिस बंदोबस्त मागविला. गावात जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आला. पहाटे शिकलगार यांचा मृत्यू झाल्याचे जाहीर करण्यात आले.

दफनविधीस नकार

मृत शिकलगार यांचा मृतदेह दिवसभर साताऱ्यातील जिल्हा रुग्णालयात ठेवण्यात आला होता. सायंकाळी तो पुसेसावळी येथे नेण्यात आला. मात्र, कुटुंबीयांनी रात्री उशिरापर्यंत दफनविधी करण्यास नकार दिला होता.

पोस्‍टप्रकरणी दोघे ताब्‍यात

पुसेसावळी येथील दंगल प्रकरणात पोलिसांनी स्‍वतंत्रपणे दोन गुन्‍हे नोंदवून घेतले आहेत. यापैकी वादग्रस्‍त पोस्‍टप्रकरणी एक तर दंगल घडवत खून केल्‍याप्रकरणी दुसरा गुन्‍हा नोंद आहे. ज्‍या वादग्रस्‍त पोस्‍टमुळे हे पडसाद उमटले, त्‍याप्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्‍यात घेतले असले, तरी त्‍याची ठोस माहिती देण्‍यास पोलिसांनी नकार दिला.

नूरहसनचा नाहक बळी

नूरहसन शिकलगार जेसीबीवर चालक म्हणून काम करत होता. त्याचा दीड वर्षापूर्वी विवाह झाला आहे. त्याचे वडील मौलाना आहेत. त्यांची कारीसाब म्हणून ओळख आहे. त्यांची आई निवृत्त परिचारिका आहे. ती पुसेसावळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नोकरीस होती. सांगली जिल्ह्यातील विट्यानजीकचे भाळवणी हे शिकलगार कुटुंबाचे मूळ गाव आहे. मात्र, ते सध्या पुसेसावळीत स्थायिक आहेत. त्यांची शेती हाही व्यवसाय आहे. वादग्रस्‍त पोस्‍टप्रकरणी नूरहसन याचा कोणताही संबंध नसल्‍याची प्राथमिक माहिती पोलिस तपासात समोर येत आहे.

Pusesawali Riots
'स्वतःचं नाव धर्मनिरपेक्ष जनता दल ठेवलं आणि जातीवादी पक्षाशी हातमिळवणी केली'; BJP-JDS युतीवर मुख्यमंत्र्यांचा प्रहार

इंटरनेट ७२ तासांसाठी बंद

पुसेसावळी येथे दंगल भडकल्‍यानंतर याची माहिती सातारा पोलिस दलाने गृह विभागास दिली. गृह विभागाने खबरदारी म्‍हणून जिल्ह्यातील इंटरनेट सेवा बंद करण्‍याच्‍या सूचना संबंधित कंपन्‍यांना केल्‍या. यानुसार बुधवारी (ता. १३) मध्‍यरात्री १२ पर्यंत जिल्‍हाभरातील इंटरनेट सेवा बंद राहणार आहे.

शाळांना सुटी

दंगलीमुळे निर्माण झालेल्‍या तणावानंतर सातारा शहर व जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयांनी खबरदारीचा उपाय म्‍हणून सोमवारी शैक्षणिक कामकाज दुपारनंतर थांबवण्‍याचा निर्णय घेतला. इंटरनेट बंद असल्‍याने शाळेतील शिक्षकांनी या निर्णयाची माहिती फोनद्वारे पालकांना देत मुलांना नेण्‍याच्‍या सूचना केल्‍या. यामुळे दुपारनंतर अनेक शाळा, महाविद्यालयांच्‍या आवारात पालकांची मोठी गर्दी झाली होती.

उदयनराजेंचे शांततेचे आवाहन

पुसेसावळी येथे दंगल उसळल्‍यानंतर खासदार उदयनराजे भोसले यांनी रात्री दोनच्या सुमारास साताऱ्यातील शाही मस्‍जिदला भेट देत मुस्‍लिम बांधवांशी चर्चा केली. झालेला प्रकार दुर्दैवी, निंदनीय असून, यापुढील काळात जिल्‍हावासीयांनी शांतता राखणे आवश्‍‍यक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वांना सर्वधर्मसमभावाची शिकवण दिली असून, त्‍याचे पालन करण्‍याचे आवाहनही त्‍यांनी यावेळी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.