NCP Political Crisis: 'अजित पवारांच्या अध्यक्षपदी निवडीबाबत शरद पवार गटाचे प्रश्नचिन्ह', निवडणूक आयोगासमोर उपस्थित केले प्रश्न

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा आणि घड्याळ चिन्ह कोणाचे, यावर निवडणूक आयोगात आजपासून नियमित सुनावणी सुरू झाली.
NCP Political Crisis
NCP Political CrisisEsakal
Updated on

‘‘राष्ट्रवादी काँग्रेसवर दावा ठोकण्यासाठी अजित पवार गटाकडून मोठ्या प्रमाणात चुकीची व बोगस कागदपत्रे दाखल करण्यात आली असल्याने या गटाचे म्हणणे ऐकले जाऊ नये. तसेच त्यांना कोणताही दिलासा दिला जाऊ नये,’’ अशी मागणी शरद पवार गटाकडून केंद्रीय निवडणूक आयोगाकडे सोमवारी करण्यात आली. पुढील सुनावणी शुक्रवारी (ता. २४) होणार असून त्यावेळीही शरद पवार गटाला बाजू मांडण्याची संधी मिळणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा आणि घड्याळ चिन्ह कोणाचे, यावर निवडणूक आयोगात आजपासून नियमित सुनावणी सुरू झाली. सुमारे पाऊण तास सुनावणी झाली. सुनावणीच्या निमित्ताने स्वत: शरद पवार यांच्यासह सुप्रिया सुळे, वंदना चव्हाण, जितेंद्र आव्हाड आदी नेते उपस्थित होते.

‘‘अजित पवार गटाने कागदपत्रे दाखल करताना जे गैरव्यवहार केले आहेत, त्याची २४ प्रकारची वर्गवारी आम्ही केली आहे. अनेक प्रतिज्ञापत्रांमध्ये चुकीची माहिती आहे. शहरात राहत नाहीत असे लोक, मृत लोक, झोमॅटोचे डिलिव्हरी बॉय, विमा एजंट अशा लोकांची प्रतिज्ञापत्रे दाखल करण्यात आली आहेत. अजित पवार गटाचे हे काम लाजीरवाणे असल्याने त्यांना दिलासा देऊ नये. तसेच निवडणूक आयोगाने आपल्या अधिकार क्षेत्रात संबंधितांविरोधात भारतीय दंड संहितेनुसार गुन्हे दाखल करावेत,’’ असा युक्तिवाद अभिषेक मनू सिंघवी यांनी शरद पवार गटातर्फे केला.

NCP Political Crisis
Eknath Shinde: मुंबईतील वाढते प्रदूषण, स्वच्छतेवरून CM शिंदे अ‍ॅक्शन मोडवर! पहाटेच प्रत्यक्ष पाहणी करत दिले महत्त्वाचे आदेश

आयोगात सुनावणी सुरू असताना ऑक्टोबरच्या अखेरीस काही प्रतिज्ञापत्रे दाखल करण्यात आली असल्याचा आरोप सिंघवी यांनी केला. प्रताप चौधरी हे शरद पवार गटाचे वरिष्ठ पदाधिकारी आहेत. त्यांनी तसे प्रतिज्ञापत्रही दिले आहे. पण त्यांची खोटी सही करून अजित पवार गटाने बोगस प्रतिज्ञापत्र जमा केले असल्याचा आरोप सिंघवी यांनी केला. अजित पवार गटाकडून कार्यकर्त्यांचीच नव्हे तर पदाधिकाऱ्यांची बोगस प्रमाणपत्रे जमा करण्यात आली आहेत, असेही ते म्हणाले. विशेष म्हणजे प्रताप चौधरी हे सुनावणीवेळी निवडणूक आयोगात हजर होते.

NCP Political Crisis
लिपिकांना लेखी परीक्षा द्यावीच लागणार! ‘सीईओ’ निर्णयावर ठाम; जिल्हा परिषदेकडून प्रशिक्षण देण्याची तयारी; जानेवारीत परीक्षेची शक्यता

वेळकाढूपणाचा अजित पवार गटाचा आक्षेप

दरम्यान, शरद पवार गटाकडून वेळकाढूपणाचे धोरण अवलंबले जात असल्याचा आक्षेप अजित पवार गटाकडून ॲड. मुकुल रोहतगी यांनी घेतला. ‘‘शरद पवार गटाकडून तेच ते प्रतिज्ञापत्राचे मुद्दे उपस्थित केले जात आहेत. निवडणुका तोंडावर आहेत, अशा स्थितीत सदर प्रकरणाचा लवकर निकाल लागणे अपेक्षित आहे,’’ असे रोहतगी यांनी सांगितले. दरम्यान येत्या शुक्रवारी शरद पवार गटाची तर, त्यानंतर पुढील मंगळवारी अजित पवार गटाची बाजू निवडणूक आयोग ऐकून घेणार आहे. अजित पवार गटाकडून सुनावणी दरम्यान सुनील तटकरे, पार्थ पवार, समीर भुजबळ, आनंद परांजपे, बृजमोहन श्रीवास्तव, रूपाली चाकणकर हे नेते उपस्थित होते.

NCP Political Crisis
राज्यातील ४० दुष्काळी तालुक्यातील शेतकऱ्यांनाच ‘इतक्या’ हजारांची मदत! वाढीव मंडळांना फक्त ८ सवलती, आर्थिक मदत नाहीच

अजित पवार यांच्या निवडीबद्दल प्रश्नचिन्ह

अजित पवार यांच्या अध्यक्षपदी निवडीबाबत शरद पवार गटाकडून प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आल्याचे समजते. शरद पवार यांच्या अध्यक्षपदाच्या निवडीवेळी अजित पवार यांनी प्रस्तावक म्हणून सही केली होती, तर मग दहा महिन्यांत असे काय झाले की त्यांनी स्वतःच अध्यक्षपदासाठी दावा केला? अजित पवार अध्यक्ष कधी झाले? त्यांच्या निवडीसाठी राष्ट्रीय अधिवेशन कधी घेण्यात आले? आदी प्रश्न शरद पवार गटाकडून उपस्थित करण्यात आले असल्याचे समजते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.