Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अशा प्रकारे केले बाळासाहेबांचे स्वप्न साकार; मुख्यमंत्र्यांनी यादीच दाखवली

CM Eknath Shinde letter to PM Narendra Modi
CM Eknath Shinde letter to PM Narendra Modiesakal
Updated on

संपूर्ण देशात सध्या ‘राम’मय वातावरण निर्माण झाले आहे. अयोध्येत राम मंदिर व्हावे, ही कोट्यवधी रामभक्तांचे स्वप्न होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणायचे, मला एक दिवस पंतप्रधान बनवा मी दोन काम प्राधान्याने करेन एक म्हणजे अयोध्येत राम मंदिर बांधणे व दुसरे काश्मीरमधून ३७० कलम हटवेन.

बाळासाहेबांची ही दोन्ही स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पूर्ण केली. त्यामुळे त्यांचे कितीही धन्यवाद दिले तरी ते कमीच आहेत असे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काशीमिरा येथे व्यक्त केले.

CM Eknath Shinde letter to PM Narendra Modi
PM Modi : ग्लोबल लीडर मोदीच! लोकप्रिय नेत्यांच्या यादीमध्ये अव्वल स्थान कायम; मेलोनी कितव्या क्रमांकावर?

राम मंदिराच्या लोकार्पणानिमित्त मिरा-भाईंदर मधून तीनशे रामभक्त पायी अयोध्येला रवाना झाले. या राम भक्तांना शुभेच्छा देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार प्रताप सरनाईक, आमदार गीता जैन, रामभवन शर्मा आदी उपस्थित होते.

या पदयात्रेचा खर्च आमदार प्रताप सरनाईक करत आहेत. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, आधी ‘हर घर मोदी’ होते आता ‘मन मन मोदी’ झाले आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अयोध्येचा चेहेरा मोहोरा बदलला आहे.

अयोध्या आंतरराष्ट्रीय पातळीवर विकसित करण्याचे काम मोदींच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी केले आहे. धर्मवीर आनंद दिघे यांनी १९८७ मध्ये कारसेवा सुरु असताना चांदीची वीट बनवली होती. आज राम मंदिर बनवायचे स्वप्न पंतप्रधान मोदींनी पूर्ण केले.

CM Eknath Shinde letter to PM Narendra Modi
Narendra Modi : मी मोदी आहे, मला मोदीजी म्हणून बोलावू नका

विरोधकांना टोला

काही जणांना राम मंदिर कधीच होणार नाही, असे वाटायचे म्हणून ते चेष्टेने म्हणत होते, की मंदिर वही बनाएंगे तारीख नही बताएंगे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंदिरही बनवले व त्याच्या लोकार्पणाची तारीखही जाहीर केली. त्यामुळे बोलणाऱ्यांची तोंडे आपोआपच बंद झाली असल्याचा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना लगावला.

CM Eknath Shinde letter to PM Narendra Modi
PM Modi On Chandrayaan-3 : लवकरच भारत चंद्रावर पाठवणार माणूस; खुद्द PM मोदींनी सांगितलं टार्गेट

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.